शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

Sharad Pawar : "पवार साहेंबांच्या अदृश्य हातांमुळे ममता बॅनर्जी जिंकल्या, पण महाराष्ट्रात प्रत्यक्ष हात असूनही…’’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 10:46 PM

Sharad Pawar News : ममता बॅनर्जींच्या विजयात शरद पवार यांचा हात असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भाजपा नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. 

मुंबई -  पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी मिळवलेल्या एकहाती विजयामागे शरद पवार यांनी केलेले मतविभाजन टाळण्याचे आवाहन कारणीभूत होते, असे विधान भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी केल्यापासून महाराष्ट्रात वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती. पश्चिम बंगालमधील भाजपाच्या विजयामागे शरद पवार यांचा अदृश्य हात असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, ममता बॅनर्जींच्या विजयात शरद पवार यांचा हात असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भाजपा नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. 

निलेश राणे यांनी ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्यात ते म्हणतात की, पवार साहेबांचे अदृश्य हात असल्यामुळे ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये जिंकल्या, असं काही जण म्हणतायत. पण पवार साहेबांचे महाराष्ट्रात प्रत्यक्ष हात असूनसुद्धा पंढरपूरची एक सीट राष्ट्रवादी जिंकू शकली नाही, असा चिमटा निलेश राणे यांनी काढला.  

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी भाजपाला एकहाती धूळ चारल्यानंतर आता देशभरात त्यांच्या या विजयाची चर्चा सुरू आहे. याचदरम्यान भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कैलास विजयवर्गीय यांच्या विधानाचा हवाला देत एक ट्विट केले होते. तसेच भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनीच हा गौप्यस्फोट केल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सर्व भाजपाविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्यानं मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसला, असं कैलास विजयवर्गी यांनी म्हटल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. कैलास विजयवर्गी यांच्या या विधानावरुन पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात होता, असा निष्कर्ष जितेंद्र आव्हाड यांनी काढला होता.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाNilesh Raneनिलेश राणे