शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

शरद पवार रुग्णालयात तर गेटबाहेरून सुप्रिया सुळेंची पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी जोरदार बॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 14:49 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार हे सध्या मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

ठळक मुद्देखासदार सुप्रिया सुळे या ब्रिच कँडी रुग्णालयातून व्हर्चुअली पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघात सभेसाठी हजर होत्या. रुग्णालयातूनच आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी सभाही घेत असल्याचे चित्र आज दिसले.पंढरपूर स्वच्छ, सुंदर आणि सुशोभीत कसं करता येईल याचा विचार आम्ही करत होतो

मुंबई - पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भगीरथ भारत भालके हे राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवत आहेत. आज निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या ब्रिच कँडी रुग्णालयातून व्हर्चुअली पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघात सभेसाठी हजर होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार हे सध्या मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. खा. सुप्रिया सुळे या एक मुलगी म्हणून रुग्णालयात आपल्या वडिलांची काळजी घेत आहेत. तर दुसऱ्या बाजुला नेत्या म्हणून रुग्णालयातूनच आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी सभाही घेत असल्याचे चित्र आज दिसले. ज्याप्रकारे शरद पवार हे ज्याप्रकारे स्वतःला झोकून देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरतात, तिच संघर्षमय वृत्ती आज सुप्रिया सुळे यांच्या कृतीतून दिसून आली.

आपल्या भाषणात सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भालके नाना यांच्यासोबत आम्ही ठरवलं होतं की पंढरपूरचा चेहरामोहरा बदलला पाहिजे. पंढरपूर स्वच्छ, सुंदर आणि सुशोभीत कसं करता येईल याचा विचार आम्ही करत होतो. त्यामुळे पंढरपूर, भालके नाना आणि मी असं आमचं एक वेगळंच नातं होतं. मात्र नाना अर्धवट साथ सोडतील असं वाटलं नव्हतं. त्यामुळे खूप विश्वासाच्या नात्याने भगीरथ भालके यांना ही जबाबदारी दिली आहे. आपण भालके नानांना श्रद्धांजली देण्यासाठी जमलो आहोत. त्यामुळे आपण नानांची अर्धवट राहिलेली स्वप्नं आणि आपल्या भागाचा सर्वांगीण विकास पूर्ण करण्यासाठी भगीरथ भालके यांना घड्याळाच्या बाजूचं बटण दाबून जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत राज्यात सध्या लागू केलेल्या कडक निर्बंधाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकार हे जनतेच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. या कोरोना महामारीच्या काळात पुन्हा लॉकडाऊन करतानाही समाजातील प्रत्येक घटकावर अन्याय होणार नाही याची काळजी या सरकारने घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन करून शासनाला सहकार्य करूया असं आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केलं.

टॅग्स :pandharpur-acपंढरपूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेPandharpur By Electionपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021