Sharad Pawar Health: Sharad Pawar re-admitted to Breach Candy hospital; Gallbladder surgery will take place tomorrow | Sharad Pawar Health: शरद पवार पुन्हा ब्रीच कँडीमध्ये दाखल; उद्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया होणार

Sharad Pawar Health: शरद पवार पुन्हा ब्रीच कँडीमध्ये दाखल; उद्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया होणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार (Sharad Pawar ) यांच्या पित्तनलिकेतील खडा एण्डोस्कोपीच्या साहाय्याने काढण्यात आला होता. शरद पवारांच्या गेल्या महिन्य़ात अचानक पोटात दुखू लागले होते. त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy hospital) दाखल करण्यात आले. त्यांच्या सीबीडी (कॉमन बाईल डक्ट) पित्ताशयाला जोडणाऱ्या नळीमध्ये एक खडा आढळला. त्यामुळे बुधवारी पहाटे एंडोस्कोपीच्या साहाय्याने तो खडा दूर करण्यात आला होता. यानंतर काही दिवसांनी त्यांना सोडण्यात आले होते. आता पुन्हा त्यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. (surgery will take place tomorrow on Sharad pawar; Nawab malik gave information.)


राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार साहेबांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज दाखल करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. पवारांना ७ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर १५ दिवसानी त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यानुसार आज दाखल करण्यात आले असून उद्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.


उपचारावेळी दिग्गज नेते रुग्णालयात
खासदार पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या टीममध्ये डॉ. प्रतित समदानी, डॉ. सुलतान प्रधान तसेच डॉ. शहारुख गोलवाला, डॉ दप्तरी, डॉ. टिबडिवाला यांचा समावेश आहे. एन्डोस्कोपीवेळी रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह नातेवाईक आणि अन्य नेते उपस्थित होते. खा. पवार यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगत उपचार करणाऱ्याा डॉक्टरांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले होते.

शरद पवार यांना नेमका काय त्रास होता? 
पवारांच्या  पित्ताशयात खडे झाले आहेत. ज्याला गॉल स्टोन म्हणतात. मध्यंतरी पोटात दुखू लागले म्हणून ते उपचारासाठी आले होते. तपासणीअंती पित्ताशयात खडे आढळून आले.  शिवाय, त्यांना रक्त पातळ होण्याचे औषध दिले जात होते. ते औषध सुरू असताना ऑपरेशन करणे शक्य नव्हते. त्यामुळे ते औषध थांबवून दोन-तीन दिवसांनी ऑपरेशन करू असे ठरले होते. मात्र, त्यातील एक खडा पित्तनलिकेत अडकल्यामुळे त्यांना वेदना वाढल्या.  कॉमन बोईल डक्टमधील खडा काढणे गरजेचे होते. त्यामुळे एण्डोस्कोपी करावी लागली. 
 

 

Web Title: Sharad Pawar Health: Sharad Pawar re-admitted to Breach Candy hospital; Gallbladder surgery will take place tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.