शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

“शरद पवार हे महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल”; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 18:18 IST

शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आहे तर मी काँग्रेसचा आहे. प्रत्येकाला आपापला पक्ष विस्तार करण्याचा अधिकार आहे.

ठळक मुद्देराज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवारांनी महत्त्वाची भूमिका निभावली. शरद पवार आमच्यावर नाराज नाहीत. महाविकास आघाडीत समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत काँग्रेस पक्षाला छुप्या मतदानाची कुठेही भीती नाही.

मुंबई – महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. मोदी सरकार इंधनावरील करातून जनतेची राजरोस लूट करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.

माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले(Nana Patole) म्हणाले की, राज्य सरकारवर मुख्यमंत्री किंवा शरद पवार यापैकी कोणाचं नियंत्रण आहे हे भाजपानं ठरवावं. परंतु शरद पवार(Sharad Pawar) महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवारांनी महत्त्वाची भूमिका निभावली. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आहे तर मी काँग्रेसचा आहे. प्रत्येकाला आपापला पक्ष विस्तार करण्याचा अधिकार आहे. शरद पवार आमच्यावर नाराज नाहीत. महाविकास आघाडीत समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय असा आरोप त्यांनी केला.

तसेच विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत काँग्रेस पक्षाला छुप्या मतदानाची कुठेही भीती नाही. जेव्हा राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते. तेव्हा त्यांनी अँन्टी डिफेंक्शन कायदा आणला होता. कायद्यात बदल करण्याची गरज महाराष्ट्रात आहे. गुप्त मतदानामुळे हे केलं जातंय असं नाही असंही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

भाजपाकडून जनतेची दिशाभूल

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असतानाही भारतात पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती दररोज वाढत आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत. शेजारच्या राष्ट्रांना भारत पेट्रोल, डिझेल ३० रुपये लिटरने देत असून आपल्याच नागरिकांना मात्र पेट्रोलसाठी १०७ रुपये तर डिझेलसाठी ९६ रुपये मोजावे लागतात. इंधनावरील एक्साईज ड्युटी, रस्ते विकास सेस व कृषी सेसच्या माध्यमातून केंद्र सरकार भरसाठ कमाई करत आहे. सेसमधून राज्य सरकारला एक रुपयाही मिळत नाही. गत ७ वर्षात इंधनावरील करातून मोदी सरकारने तब्बल २५ लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली आहे असा टोला नाना पटोलेंनी लगावला.    

त्याचसोबत इंधनाचे भाव दररोज वाढत असताना त्यातून केंद्रातील भाजपा सरकार जनतेला काहीच दिलासा देत नाही उलट भारतीय जनता पक्षाचे नेते राज्य सरकारने कर कमी करावेत असा उफराटा सल्ला देत आहेत. राज्य सरकारचे इंधनावरील कर हे केंद्र सरकारपेक्षा फारच कमी आहेत. केंद्र सरकार कररुपाने आपली तिजोरी भरत आहे. उलट राज्य सरकारच्या हक्कांचा जीएसटी परतावाही केंद्र देत नसतानाही इंधन दरवाढीतून जनतेला दिलासा देण्याची जबाबदारी राज्य सरकारवर ढकलणे ही भाजपाकडून केली जाणारी दिशाभूल आहे असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.    

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNana Patoleनाना पटोलेNCPराष्ट्रवादी काँग्रेस