“दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठवणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये”

By प्रविण मरगळे | Published: October 5, 2020 04:14 PM2020-10-05T16:14:54+5:302020-10-05T16:20:35+5:30

Hathras Gangrape, Ramdas Athvale, Sanjay Raut News: दलितांच्या प्रश्नांवर आम्ही सतत लढत आलो आहोत पण संजय राऊत हे कधी सामनामधूनही दलित अत्याचाराच्या प्रश्नावर व्यक्त झाले नाहीत असा आरोप रामदास आठवलेंनी केला.

"Sanjay Raut never raised his voice against Dalit atrocities, should not teach us" Ramdas Athwale | “दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठवणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये”

“दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठवणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये”

Next
ठळक मुद्देबाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती त्या भूमिकेला हरताळ फासण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहेएखाद्या अभिनेत्री महिलेवर अतिप्रसंगचा एवढा अन्याय झाला असताना त्या महिलेची बाजू संजय राऊत यांनी घेतली नाही.संसदेत खासदार म्हणून ही दलित अत्याचार प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला नाही

मुंबई - शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आजपर्यंत कधीही दलित अत्याचाराविरुद्ध ब्र शब्द काढला नाही. दलित अत्याचारविरुद्ध कधी ते पुढे आले नाहीत. दलित अत्याचार जिथे होईल तेथे मी पोहोचलेलो आहे. दलित अत्याचाराविरुद्ध सतत लढत राहिलो आहे. दलित पँथरच्या चळवळीतून मी पुढे आलो आहे. त्यामुळे दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या खासदार संजय राऊतांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचं शिकवू नये असा जोरदार टोला रिपाई अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी लगावला आहे.

याबाबत रामदास आठवले म्हणाले की, संजय राऊत हे नटींच्या घोळक्यात असतात की नाही ते माहीत नाही. मी नटींच्या घोळक्यात नसतो, मी मात्र नेहमी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असतो. हाथरसची घटना घडली त्यादिवशी मुंबईत राज्यपालांची पूर्वनियोजित भेट ठरली होती. ती भेट झाल्यानंतर आम्हाला हाथरसच्या घटनेची माहिती मिळाताच त्या अमानुष घटनेचा आम्ही तीव्र निषेध केला. आंदोलन केले. लखनऊला जाऊन उत्तर प्रदेशच्या राज्यपालांना भेटलो. हाथरसला भेट देण्यास जाताना तेथील जिल्हा प्रशासनाने सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेट देण्यापासून रोखले होते. त्यामुळे मी 2 ऑक्टोबरला हाथरस जाऊ शकलो नाही आता मात्र उद्याच हाथरसला जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे. त्यांना संरक्षण मिळवून देणार अहे असा खुलासा त्यांनी केला.

तसेच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जे कलावंतांची कदर करणारे नेते होते. त्यांचे अनेक चित्रपट कलाकारांशी चांगले संबंध होते. त्यामुळे एखाद्या अभिनेत्री महिलेवर अतिप्रसंगचा एवढा अन्याय झाला असताना त्या महिलेची बाजू संजय राऊत यांनी घेतली नाही. कलाकार अभिनेत्री यांना महिला म्हणून सन्मान न देता त्यांना जाहीर अपशब्द वापरले आहेत. त्यातून कलाकारांचा सन्मान करण्याची बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती त्या भूमिकेला हरताळ फासण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे. कंगना राणौत प्रकरणात आम्ही कधीही संजय राऊत यांच्यावर टीका केली नाही ते आमच्यावर टीका करीत असले तरी त्यातून मी त्यांच्यावर नाराज नाही. ते माझे मित्र आहेत. पायल घोष ही अभिनेत्री महिला तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत भूमिका मांडते. ती अभिनेत्री असली तरी महिला आहे त्यातून आम्ही तिची बाजू घेतली संजय राऊत यांनी तिची बाजू घेतली का? जिथे जिथे महिलांवर दलितांवर अत्याचार होतात तिथे तिथे आम्ही त्या त्या महिलेची बाजू घेत आलो आहोत. दलितांच्या प्रश्नांवर आम्ही सतत लढत आलो आहोत पण संजय राऊत हे कधी सामनामधूनही दलित अत्याचाराच्या प्रश्नावर व्यक्त झाले नाहीत असा आरोप रामदास आठवलेंनी केला.

त्याचसोबत संसदेत खासदार म्हणून ही दलित अत्याचार प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला नाही. दलितांच्या प्रश्नांवर दलित लढत असतात पण दलितांच्या प्रश्नांसाठी सवर्ण पुढाऱ्यांनी कधी लढा उभारला आहे का? दलितांचे मतदान हवे आहे पण दलितांवरील अत्याचाराचा साधा निषेध तरी यापूर्वी कधी संजय राऊत आणि त्यांच्या पक्षनेत्यांनी केला आहे का? असा सवाल रामदास आठवले यांनी केला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

रामदास आठवले हे सध्या विनोदाचा विषय ठरत आहेत, कंगना राणौतच्या घरी जाऊन भेटले, त्यांचे कार्यकर्ते तिच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले. पायल घोष या नटीला घेऊन राज्यपालांना भेटले, मात्र हाथरसची एक दलित मुलगी मृत्यूशी झुंज देत होती, तिच्यावर अत्याचार झाला, तेव्हा आयुष्यमान आठवले नट्यांच्या घोळक्यात भलतेच उद्योग करत होते, देशात दलित चळवळ, आंबेडकरी विचारांचा विध्वंस आहे असं संजय राऊत सामना अग्रलेखातून म्हणाले होते.

Web Title: "Sanjay Raut never raised his voice against Dalit atrocities, should not teach us" Ramdas Athwale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app