शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

Sanjay Raut : "महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय मजबुरी", संजय राऊतांनी दिली कबुली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 19:29 IST

Sanjay Raut reaction on "Mahavikas Aghadi : राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे कमालीचे अडचणीत आले आहे.

मुंबई - राज्यात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे कमालीचे अडचणीत आले आहे. या काळात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आघाडीवर राहून विरोधकांचे मुद्दे खोडून काढत सरकारचा बचाव करत आहे. मात्र आज एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज्यातील महाविकास आघाडीबाबत धक्कादायक विधान केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी ही राजकीय मजबुरीमधून जन्माला आली आहे. त्याला भाजपा कारणीभूत आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. ("Mahavikas Aghadi is Shiv Sena's political compulsion", confessed Sanjay Raut)

महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीबाबत भाष्य करणारी मुलाखत संजय राऊत यांनी दैनिक भास्कर या वृत्तपत्राला दिली आहे. त्या मुलाखतीत संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही राजकीय अपरिहार्यता आहे. हे भाजपामुळे घडले आहे. हे तिन्ही पक्ष वेगवेगळ्या विचारसरणीचे आहे. मात्र आम्ही हिंदुत्वासोबत कुठलीही तडजोड केलेली नाही. तसेच आमचा हिंदुत्वाचा अजेंडाही बदललेला नाही, असे संजय राऊत म्हणाले. ॉयावेळी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात शिवसेना परमबीर सिंग यांचं कौतुक करायची मात्र आता दोघेही आमने-सामने का आले आहेत, असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, हे तेच पोलीस आयुक्त आहेत ज्यांच्यावर सुशांत आणि कंगना प्रकरणामध्ये भाजपाने विश्वास ठेवला नव्हता. मात्र आता त्यांच्याच एका पत्राच्या बाजूने भाजपा गोंधळ घालत आहे. महाराष्ट्रात मोठे पोलीस दल आहे. यामध्ये एक असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टरसाख्या छोट्या पदावरील व्यक्ती कसा काय मोहरा, असू शकतो असे सांगत राऊत यांनी फडणवीसांचा दावा फेटाळून लावला आहे. यावेळी यूपीएबाबतही संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, सोनिया गांधी ह्या दीर्घकाळापासून यूपीएचे नेतृत्व करत आहेत. मात्र आज यूपीए खूप कमकुवत झाली आहे. ती एवढी कमकुवत झाली आहे की भाजपासमोर उभी राहू शकत नाही आहे. यूपीएमध्ये आज खूप कमकुवत नेते आहेत आणि देशातील सर्व प्रादेशिक पक्ष ना काँग्रेससोबत जाऊ इच्छित आहेत ना भाजपासोबत जाऊ इच्छित आहेत. देशात जेव्हा जेव्हा तिसरी आघाडी उभी राहिली आहे तेव्हा तेव्हा ती अपयशी ठरली आहे. त्यामुळे यूपीएला भक्कम बनवण्यासाठी काँग्रेसला मन मोठं करावं लागेल. यूपीएचे नेतृत्व अनुभवी नेत्याकडे असले पाहिजे. अशी व्यक्ती केवळ शरद पवार आहे, असेही राऊत यांनी सांगितले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस