शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

Sanjay Raut :"आमचे राज्यपाल करुणेचा सागर, पण मांडीखाली दाबून ठेवलेले आमदार मोकळे करावेत", संजय राऊतांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 13:14 IST

Sanjay Raut criticizes governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल नियुक्त आमदार मोकळे केले तर राज्यपालांच्या मनात घटनेविषयी करूणा आहे, हे देशाला समजेल,असा टोलाही यावेळी संजय राऊत Sanjay Raut यांनी लगावला.

ठळक मुद्देराज्यातील महाविकास आघाडी सरकारने 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे, मात्र, अद्याप या नावांना राज्यपालांकडून मंजुरी मिळालेली नाही.

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा प्रलंबित पडला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे, पण त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)  यांच्यावर निशाणा साधला आहे. "आमचे राज्यपाल करुणेचा सागर आहेत. याच करुणा भावनेने त्यांनी कायदा आणि घटनेवर करुणा दाखवावी आणि राज्यपालांनी त्यांच्या मांडीखाली दाबून ठेवलेले 12 राज्यपाल नियुक्त सदस्य मोकळे करावेत", असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (Sanjay Raut criticizes governor Bhagat Singh Koshyari on 12 governer oppointed MLA approval)

मंगळवारी मुंबईतसंजय राऊत प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्र हा संतांचा प्रदेश आहे. करुणेचा उगम हा महाराष्ट्रातूनच झाला. कदाचित म्हणूनच राज्यपालांना महाराष्ट्रात रमावं वाटत असेल. आमचे राज्यपाल करुणेचा सागर आहेत. याच करुणा भावनेने त्यांनी कायदा आणि घटनेवर करुणा दाखवावी. 12 राज्यपाल नियुक्त सदस्य त्यांनी त्यांच्या मांडीखाली दाबून ठेवले आहेत. ते त्यांनी मोकळे करावेत."  

याचबरोबर, राज्यपाल नियुक्त आमदार मोकळे केले तर राज्यपालांच्या मनात घटनेविषयी करूणा आहे, हे देशाला समजेल,असा टोलाही यावेळी संजय राऊत यांनी लगावला. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा प्रलंबित पडला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे, मात्र, अद्याप या नावांना राज्यपालांकडून मंजुरी मिळालेली नाही. याच कारणामुळे राज्य सरकारने अनेकवेळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

आधी 12 आमदारांची नावं, त्यानंतरच...; अजित पवारांकडून विरोधकांची कोंडीराज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरु झाले आहे. विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या 12 आमदरांच्या नावाला राज्यपालांनी अद्याप मंजुरी न दिल्याने अधिवेशनात काल या मुद्द्यावरुन राजकारण तापले. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशनाचे कामकाज सुरु होताच मराठवाडा, विदर्भातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सडेतोड उत्तर दिले.महाविकास आघाडीचे सरकार विदर्भ विकास महामंडळ झाले पाहिजे या मताचे आहे. ते झालेच पाहिजे याबाबत सरकारचे दुमत व्हायचे कारण नाही. पण कॅबिनेटने एक निर्णय घेतला आहे. ज्यावेळी राज्यपालांकडे पाठवलेली 12 नावs जाहीर होतील त्यादिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळ आम्ही स्थापन करणार आहोत, असे अजित पवारांनी म्हटले आहे. तसेच, बजेटमध्ये तसा निधीही ठेवला आहे, असेही अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMumbaiमुंबईState Governmentराज्य सरकार