शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

‘साहेब’ झुकले ते कार्यकर्त्यांच्या दबावामुळे....आणि म्हणून निवडला ‘पार्थ ’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 12:15 IST

लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांत राष्ट्रवादीला पक्ष अंतर्गत गटबाजी व बंडखोरीचा फटका बसला.

ठळक मुद्देमावळ लोकसभा निवडणूक : शरद पवार झुकले गटबाजी रोखण्यासाठी खेळीयुतीपुढे मनोमिलनाचे आव्हान

- हणमंत पाटील- पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांच्या दबावापुढे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे झुकले आहेत. त्यांनी एक पाऊल मागे घेत  पक्षातील गटबाजी व बंडखोरी रोखण्यासाठी पार्थ पवार यांच्या उमेदवारीची खेळी केली. सुरूवातीला पवार यांनी नकार दिला असला तरी पार्थची उमेदवारी ही अपेक्षितच होती. लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांत राष्ट्रवादीला पक्षाअंतर्गत गटबाजी व बंडखोरीचा फटका बसला. त्याचा फायदा होऊन शिवसेनेचे गजानन बाबर व श्रीरंग बारणे विजयी झाले होते.  आगामी निवडणुकीत गटबाजी रोखण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मुलगा पार्थ यांना उमेदवारी देण्याची चाचपणी सहा महिन्यांपूर्वीच सुरू होती. मावळ मतदार संघातील विविध कार्यक्रमांना पार्थ आवर्जुन उपस्थित राहू लागल्यानंतर त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली. मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी, चिंचवड आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यांपैकी तीन  भाजपाकडे, दोन शिवसेना व एक राष्ट्रवादीचे आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थातील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे. शेतकरी कामगार पक्षाची राष्ट्रवादीशी आघाडी आणि युतीतील वादाच्या फायदा घेण्यासाठी पार्थ यांच्या उमेदवारीची खेळी करण्यात येत आहे. मतदार संघातील स्थानिक नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा व शेकापकडून शिफारस झाल्यानंतर शरद पवार यांनी एक पाऊल मागे घेत पार्थ यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखविला आहे. --------------गटबाजी रोखण्यासाठी खेळी मतदार संघाच्या पुर्नरचनेनंतर २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आझम पानसरे यांच्या निवडणुकीत आमदार लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी केली. त्याचा फायदा शिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांना विजयासाठी झाला. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत बंडखोरी व गटबाजीच्या भीतीने राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी पक्षांतर करीत शेकापची उमेदवारी घेतली होती. राष्ट्रवादीतील गटबाजी व बंडखोरी रोखण्यासाठी पार्थ पवार यांच्या उमेदवारीची खेळी करण्यात आली आहे. पार्थ हे नवखे असलेतरी त्यांची उमेदवारी म्हणजे अजित पवार हेच मैदानात असल्याचे चित्र आहे. ---------------युतीपुढे मनोमिलनाचे आव्हानकाही दिवसांपूर्वीच भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप समर्थक पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक नेते व पदाधिका-यांनी मावळ लोकसभा मतदार संघ शिवसेनेऐवजी भाजपाला देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना साकडे घेतले होते. शिवसेनेने विद्यमान खासदार बारणे यांचा पराभव झाल्यास भाजपाचे कार्यकर्ते जबाबदारी घेणार नाहीत, असा दावा केला होता. बारणे व जगताप यांचे टोकाचे वाद आहेत. त्यामुळे युतीपुढे दोन्ही पक्षातील नेते व कार्यकर्त्यांचे मनोमीलन करण्याचे आव्हान आहे. ------------- 

टॅग्स :mavalमावळSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक