शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

"लतादीदी, सचिन तेंडुलकर ही आमची दैवतं; त्यांच्या नव्हे, भाजप आयटी सेलच्या चौकशीचे आदेश दिलेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 16:17 IST

भाजप आयटी सेल प्रमुखांसह १२ इन्फ्लुएन्सर्सची नावं प्राथमिक तपासात समोर आल्याचा गृहमंत्री अनिल देशमुखांचा दावा

ठळक मुद्देभाजप आयटी सेल प्रमुखांसह १२ इन्फ्लुएन्सर्सची नावं प्राथमिक तपासात समोर, गृहमंत्र्यांचा दावासचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांची चौकशी करण्याचा प्रश्नच नाही, गृहमंत्र्यांचं वक्तव्य

गानसम्राज्ञी लता मंगेशकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह इतर सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात कुणाच्या दबावाखाली ट्वीट केलं होतं का, याची चौकशी राज्याच्या गुप्तवार्ता विभागाकडून करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यापूर्वी दिलं होतं. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटला भारतीय सेलिब्रिटींनी प्रत्युत्तर दिलं होतं. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री देशमुख यांच्याशी झूमवर संपर्क करून ‘त्या’ ट्वीट्सची चौकशी करण्याची मागणी केली होती. दरम्यान, या प्रकरणी बोलताना आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचं सांगत अनिल देशमुख यांनी आपण लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या चौकशीचे आदेश दिलेच नव्हते असं म्हटलं. पत्रकारांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी या प्रकरणी भाष्य केलं. मध्यंतरी जे सेलिब्रिटींच्या ट्वीटच्या बाबतीत सुरू होतं त्यात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. ज्या सेलिब्रिटींचे शेतकरी आंदोलनादरम्यान ट्वीट आले होते त्याप्रकरणी मी भाजपच्या आयटी सेलची चौकशी करू असं म्हटलं होतं. परंतु माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून लता मंगेशकर यांची चौकशी करणार, सचिन तेंडुलकर यांची चौकशी करणार अशा बातम्या आल्या होत्या. लतादीदी या आमच्या दैवत आहेत. सचिन तेंडुलकरला भारतातील प्रत्येक व्यक्ती मानते. अशा व्यक्तींची चौकशी करण्याचा प्रश्नच नव्हता," असं अनिल देशमुख म्हणाले. मी जो आदेश दिला होता तो भाजपचा आयटी सेल आहे त्यांची चौकशी करण्याचा होता. त्यांनी काही स्क्रिप्ट दिली का? प्राथमिकरित्या आम्ही चौकशी केली आहे. त्यात भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख आणि १२ इन्फ्लुएन्सर्सची नावं समोर आली आहेत. पुढील चौकशी रितसर सुरू आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखSachin Tendulkarसचिन तेंडुलकरLata Mangeshkarलता मंगेशकरTwitterट्विटरBJPभाजपा