OBC Reservation: “खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला?”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 12:49 PM2021-06-26T12:49:58+5:302021-06-26T12:53:08+5:30

OBC Reservation: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर निशाणा साधत, भाजपाचे ओबीसी आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलन हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.

rohini khadse criticised devendra fadnavis over obc reservation | OBC Reservation: “खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला?”

OBC Reservation: “खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला?”

Next
ठळक मुद्देरोहिणी खडसेंचा ओबीसी आरक्षणावरून भाजपवर हल्लाबोल भाजपाचे ओबीसी आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलन हास्यास्पदओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला?; रोहिणी खडसेंचा सवाल

मुंबई: ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, राजकीय व इतर क्षेत्रातील व जिल्ह्यातील आरक्षण पूर्ववत करा, अन्यथा सत्ता सोडा, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा अशा मागण्यांसह भाजपने राज्यभर ठाकरे सरकारविरोधात चक्काजाम आंदोलन केले आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, बीड, नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद, नाशिक अशाविविध ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आणि ओबीसी नेते रस्त्यावर उतरले. अशातच आता भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर निशाणा साधत, भाजपाचेओबीसी आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलन हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. (rohini khadse criticised devendra fadnavis over obc reservation)

मुंबईत आशिष शेलार आणि मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड टोलनाक्याजवळ भाजपने चक्काजाम आंदोलन केले. ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त राज्यात ठिकठिकाणी करण्यात आला आहे. आशिष शेलार आणि भाजप कार्यकर्त्यांनी मुलुंड टोलनाक्याजवळ रस्त्यावरच ठिय्या देत ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावरून आता रोहिणी खडसे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. 

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप आक्रमक, राज्यभर जोरदार निदर्शनं अन् रास्तारोको

ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला?

ते आंदोलन करताना मा. खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना, अशी विचारणा रोहिणी खडसे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. भाजपाचेओबीसी आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलन हास्यास्पद आहे. फक्त राजकारण करण्यासाठी हे आंदोलन आहे. आरक्षण ओबीसी समाजाला मिळायलाच हवे यात कोणाचेही दुमत नाही, फक्त यात राजकारण करू नका, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. 

हे तुम्हाला माहित व्हायला हवे होते

आदरणीय फडणवीस साहेब. तुम्ही ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर १/८/२०१९ रोजी तसेच दि. १८/९/२०१९ रोजी राज्य सरकारकडून केंद्राकडे इंपिरिकल डाटा मागितला होता ना? तो मिळाला नाही. खरेतर तेव्हाच अध्यादेशाद्वारा केलेले आरक्षणातील बदल टिकणार नाही, हे तुम्हाला माहित व्हायला हवे होते, असेही रोहिणी खडसे म्हणाले. 
 

Web Title: rohini khadse criticised devendra fadnavis over obc reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.