शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

"भारतरत्नांच्या चौकशीचे आदेश मागे घ्या, अन्...", राम कदमांचे गृहमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 12:21 IST

Ram Kadam writes letter to Anil Deshmukh : राम कदम यांनी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित गानकोकीळा लता मंगेशकर आणि भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, तसेच अभिनेता अक्षयकुमार, सुनील शेट्टी यांच्या ट्विटची चौकशी रद्द करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्दे"सोनम कपूर, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, परिणीती चोप्रा यासारख्या सेलिब्रिटींची चौकशी करावी,"

मुंबई : 'भारतरत्नां'ची चौकशी करण्याचे आदेश मागे घ्यावेत आणि सोनम कपूर, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, परिणीती चोप्रा यासारख्या सेलिब्रिटींची चौकशी करावी, अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात राम कदम यांनी अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे. (Ram Kadam writes letter to Anil Deshmukh asks not to enquire Bharatratna Lata Mangeshkar Sachin Tendulkar)

राम कदम यांनी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित गानकोकीळा लता मंगेशकर आणि भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, तसेच अभिनेता अक्षयकुमार, सुनील शेट्टी यांच्या ट्विटची चौकशी रद्द करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर, काँग्रेसची भाषा बोलणारे सेलिब्रिटीची सोनम कपूर, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, परिणीती चोप्रा, हृतिक रोशन, स्वरा भास्कर, अली फजल, रवीश कुमार, हार्दिक पटेल अशा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींत्या ट्विटची चौकशी करण्याची मागणी राम कदम यांनी अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने पाठिंबा देणारे ट्विट केले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार यासारख्या सेलिब्रिटजनी ट्विट करत तिला प्रत्युत्तर दिले होते. या सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याने याची चौकशी करण्यात येणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. यावरून भाजपा नेत्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सेलिब्रिटींच्या ट्विटबद्दल काय म्हणाले अनिल देशमुख?काल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटीजच्या ट्विटच्या चौकशी करण्याची मागणी केली होती. एकाच वेळी सेलिब्रिटीजने ट्विट करण्यामागचे कारण काय? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? या सेलिब्रिटजचा बोलविता धनी कोण आहे? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. 

यावर अनिल देशमुख यांनी सांगितले की, ही बाब गंभीर आहे. त्याचा तपास झाला पाहिजे. याबाबतची जबाबदारी गुप्तचर खात्याला दिली आहे. तसेच, सर्व सेलिब्रिटीचे ट्विट एकसारखे कसे काय असू शकतात. त्यांच्यावर कुठला दबाव होता का? असा सवालही अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार शेतकरी आंदोलनाबाबत भारतीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटची चौकशी करण्याची शक्यता आहे.

"भारतरत्नांची चौकशी करणारे असे 'रत्न' देशात कुठेही सापडणार नाहीत", देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोलभारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे, अशा शब्दांत भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. "भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे," असे ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेससह राज्य सरकारवर टीका केली आहे. 

याचबरोबर, कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. तसेच, भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा, असे म्हणत या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे  केला आहे.

टॅग्स :Ram Kadamराम कदमAnil Deshmukhअनिल देशमुखBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSachin sawantसचिन सावंतLata Mangeshkarलता मंगेशकरSachin Tendulkarसचिन तेंडुलकरAkshay Kumarअक्षय कुमारSonam Kapoorसोनम कपूरSwara Bhaskarस्वरा भास्कर