शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

Rajyasabha Election: राज्यसभा निवडणुकीत भाजप ११ पैकी १० जागा जिंकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 12:18 AM

सध्या राज्यसभेत भाजपचे ८६ खासदार असून काँग्रेसची संख्या घटून ३८ होणार आहे. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये भाजप ९ तर उत्तराखंडमधील एकमेव जागा जिंकण्याची शक्यता आहे.

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) काही पक्ष बाहेर पडले असले तरी सत्ताधारी भाजपची राज्यसभेतील सदस्य संख्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील राज्यसभेच्या ११ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक होईल तेव्हा ९४ झालेली असेल. या ११ पैकी जवळपास दहा जागा जिंकण्याची तयारी भाजपने त्या त्या राज्यांच्या विधानसभांत असलेल्या आपल्या संख्येच्या बळावर केलीआहे.

सध्या राज्यसभेत भाजपचे ८६ खासदार असून काँग्रेसची संख्या घटून ३८ होणार आहे. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये भाजप ९ तर उत्तराखंडमधील एकमेव जागा जिंकण्याची शक्यता आहे. भाजपचे तीन सदस्य नागरी उड्डयन मंत्री हरदीप सिंग पुरी, सरचिटणीस अरूण सिंह आणि नीरज शेखर यांना पुन्हा संधी मिळू शकेल. परंतु, भाजप जास्तीच्या सहा जागा जिंकेल. समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशमध्ये फक्त एक जागा जिंकू शकेल. सपचे नेते मुलायम सिंह यादव यांचे बंधू राम गोपाल यादव यांना पुन्हा संधी मिळू शकते. सपची राज्यसभेतील सदस्य संख्या आठवरून पाच होणार आहे. राज्यसभेत बहुजन समाज पक्षाचे फक्त दोन सदस्य असतील. त्याच्याकडे १९ आमदार असल्यामुळे तो स्वत:चा कोणताही उमेदवार निवडून आणू शकत नाही.९ नोव्हेंबरला निवडणूकउत्तर प्रदेशमधील १० आणि उत्तराखंडमधील एका राज्यसभा जागेसाठी निवडणूक कार्यक्रम आयोगाने मंगळवारी जाहीर केला. ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी २० आॅक्टोबर रोजी अधिसूचना जारी होईल. २७ ऑक्टोबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, तर २ नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. निवडणूक झाल्यावर दोन दिवसांनी निकाल जाहीर होईल.

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा