पेगासस प्रकरणावरुन राज्यसभेत गदारोळ, तृणमूल खासदाराने केंद्रीय मंत्र्यांच्या हातून कागद घेऊन फाडला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 04:09 PM2021-07-22T16:09:40+5:302021-07-22T16:14:48+5:30

Rajya Sabha High Voltage Drama: या गोंधळानंतर राज्यसभेची कार्यवाही उद्यापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

Rajya Sabha updates: Trinamool MP snatches paper from Union IT minister ashwini vaishnav | पेगासस प्रकरणावरुन राज्यसभेत गदारोळ, तृणमूल खासदाराने केंद्रीय मंत्र्यांच्या हातून कागद घेऊन फाडला

पेगासस प्रकरणावरुन राज्यसभेत गदारोळ, तृणमूल खासदाराने केंद्रीय मंत्र्यांच्या हातून कागद घेऊन फाडला

Next
ठळक मुद्देपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मार्शलला पाचारण करण्यात आले.

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहात गदारोळ सुरुच आहे. गुरुवारी विरोधी खासदारांनी पेगासस गुप्तहेरी प्रकरणासह अनेक मुद्द्यावरुन जोरदार प्रदर्शन केले. दरम्यान, पेगासस प्रकरणावर राज्यसभेत बोलताना IT मंत्री अश्विनी वैष्णव यांना मध्येच आपले बोलणे थांबवावे लागले. 

अश्विनी वैष्णव पेगासस प्रकरणावर बोलण्यासाठी उभे राहिले असता तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनु सेन यांनी वैष्णव यांच्या हातून कागद घेऊन फाडला. तरेदीखेल वैष्णव बोलत राहिले, पण त्यांना आपले बोलणे मध्येच थांबवावे लागले. यानंतर भाजप आणि तृणमूल खासदारांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मार्शलला पाचारण करण्यात आले.

या गोंधळानंतर राज्यसभेची कार्यवाही उद्यापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. आज तिसऱ्यांदा सभागृहाची कार्यवाई थांबवण्यात आली. सकाळी कार्यवाही सुरू झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे दुपारी 12 वाजेर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत कार्यवाही स्थगित करावी लागली. तर, लोकसभेतही कार्यवाही सायंकाळी 4 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
 

 

Web Title: Rajya Sabha updates: Trinamool MP snatches paper from Union IT minister ashwini vaishnav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.