राजनाथ सिंह विरुद्ध प्रमोद कृष्णम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 04:45 IST2019-04-18T04:45:39+5:302019-04-18T04:45:50+5:30

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याविरोधात लखनौमधून काँग्रेसने आचार्य कृष्णम यांना उमेदवारी दिली आहे.

Rajnath Singh vs Pramod Krishnam | राजनाथ सिंह विरुद्ध प्रमोद कृष्णम

राजनाथ सिंह विरुद्ध प्रमोद कृष्णम

लखनौ : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याविरोधात लखनौमधून काँग्रेसने आचार्य कृष्णम यांना उमेदवारी दिली आहे. राम मंदिर आंदोलनात सक्रिय असलेल्या आचार्य प्रमोद कृष्णम यांना उमेदवारी देऊ न, आपण मंदिराच्या विरोधात नाही, असेच जणू काँग्रेसने स्पष्ट केले आहे. राम मंदिर उभारणीत मोदी सरकारच अडथळा आहे, असा आरोप प्रमोद कृष्णम सातत्याने करीत आले आहेत.
त्यांनी यापूर्वी संभलमधून निवडणूक लढवली होती. विश्वबंधुत्व तसेच हिंदू-मुस्लीम ऐक्याचा ते प्रचार करीत असतात. राजनाथ सिंह यांच्याविरोधात समाजवादी पक्षातर्फे पूनम शत्रुघ्न सिन्हा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र त्या कदाचित प्रयागराजमधून रिंगणात उतरतील, असेही सांगण्यात येते.

Web Title: Rajnath Singh vs Pramod Krishnam