शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाळीची चाहूल, पायलट गटाच्या ज्येष्ठ आमदाराने दिला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 17:18 IST

Rajasthan Politics News: राजस्थान काँग्रेसमधील सचिन पायलट गटातील नेते माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार हेमाराम चौधरी य़ांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

जयपूर - गेल्या काही महिन्यांपासून शांत असलेल्या राजस्थानमध्ये पुन्हा एकदा राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. राजस्थानकाँग्रेसमधीलसचिन पायलट गटातील नेते माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार हेमाराम चौधरी य़ांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. (Politics news of rajasthan) बाडमेरमधील गुडामालानी विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे आमदार असलेल्या हेमाराम चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांना आपला राजीनामा पाठवला आहे. (Rajasthan Congress rebels again, senior MLA Hemaram Chaudhary of Pilot group resigns)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले हेमाराम चौधरी दीर्घकाळापासून पक्षात नाराज होते. गतवर्षी झालेल्या राजकीय नाट्यावेळी ते मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या विरोधी गट असलेल्या सचिन पायलट गटासोबत होते. दरम्यान, हेमाराम चौधरी यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर राजस्थानमधील राजकीय पारा एकदम वाढला आहे. मात्रा आतापर्यंत याबाबत चौधरी यांचे मत समोर आलेले नाही. मात्र त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पाठवलेला राजीनामा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  पक्षाचे ज्येष्ठ नेते असूनही हेमाराम चौधरी यांना अशोक गहलोत सरकारमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. तेव्हापासून ते नाराज असून, ते अनेकदा आपली नाराजी जाहीर करत आहेत. हेमाराम चौधरी यांनी प्रादेशिक विकासकार्यांमध्ये भेदभाव केल्याचा आरोप गहलोत सरकारवर केला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेमध्ये चौधरी यांनी आपल्या सरकारवर जाहीर टीका केली होती. त्यांच्या मतदारसंघात विकासकामे होत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. 

विधानसभेत बोलताना चौधरी यांच्या मनातील सल उघड झाली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, वैर घ्यायचे असेल तर ते माझ्याशी घ्या. या प्रदेशातील जनतेला त्रस्त करू नका. चौधरी यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील हटवण्यावरूनही नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौधरी यांनी १४ फेब्रुवारी २०१९ रोजीही राजीनामा दिला होता. मात्र तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी हा राजीनामा स्वीकारला नव्हता.

टॅग्स :congressकाँग्रेसRajasthanराजस्थानPoliticsराजकारणSachin Pilotसचिन पायलट