शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

'राज ठाकरेंच्या सभांचा खर्च टाका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नावावर!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 07:01 IST

पीयूष गोयल म्हणाले, हा तर सरोगेटेड प्रचार

- संतोष ठाकूर / विकास झाडे नवी दिल्ली : महाराष्ट्रात विविध भागांत मनसेच्या सभा होत असून याचा खर्च काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रचारखर्चात टाकायला हवा, असे मत रेल्वेमंत्री आणि भाजपचे नेते पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. मनसे दोन्ही पक्षांसाठी सरोगेटेड प्रचार करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. ‘लोकमत’ च्या विशेष मुलाखतीत त्यांनी राज्यात ४0 ते ४२ जागा भाजपला मिळतील, असाही दावा केला.

निवडणूक आयोग अशा प्रचारास मान्यता देत नाही. तथापि, भाजपला देशात पूर्वीपेक्षा अधिक जागा मिळतील. हा आकडा चकित करणारा असेल. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे काम खूपच चांगले आहे. त्यामुळे राज्यात आमच्या युतीला ४२-४४ जागा मिळतील. देशभरात मतदार पुढे येऊन मोदी लाट दाखवून देत आहेत, असेही ते म्हणाले.पीयूष गोयल म्हणाले की, राज ठाकरे पूर्वी राष्ट्रवादी व काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करत. राज ठाकरे यांनी स्वत: पंतप्रधान मोदी यांचे कौतुकही केले आहे. मात्र, ज्या प्रकारे त्यांनी आपली लोकप्रियता गमावली, त्यामुळे ते अशा प्रकारची पावले उचलत आहेत. राज ठाकरे यांच्या प्रचाराचा कोणताही परिणाम भाजप-शिवसेनेवर होणार नाही. जी व्यक्ती एकही जागा लढवीत नाही त्यातून त्यांचा आपला पक्ष आणि स्वत:वर किती विश्वास आहे, हेच उघड होते. अर्थात, त्यांच्या सभेत विनोद-थट्टा अधिक होते. मुद्द्यांमध्ये काही दम असत नाही. पीयूष गोयल यांनी सांगितले की, विदर्भात आम्हाला कमी जागा येतील असे आमचे पत्रकार मित्र म्हणत होते. पण निवडणुका जवळ आल्यानंतर तेच म्हणू लागले की, आमचा विदर्भात मोठा विजय होईल. मराठवाडा व मुंबईमध्येही आम्हाला मोठा विजय मिळेल.मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेचे आधुनिकीकरण, ट्रान्सहार्बर लाइन, कोस्टल रोडपासून ते अनेक कामे आमच्या सरकारने केली आहेत. मराठवाड्यात लातूरमध्ये विक्रमी वेळेत रेल्वे कोच फॅक्टरीचे काम सुरू केले आहे. अमेठीच्या रेल्वे कोच फॅक्टरीची तुलना करायची झाली तर लातूरमध्ये केवळ ६० दिवसांत मंजुरी देऊन भूमिपूजन केले. लवकरच काम सुरू होईल, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
मुंबई-नागपूर मेट्रोसह नव्या रेल्वेचे कोच लातूरमध्ये तयार व्हावेत, असा आमचा प्रयत्न आहे. मराठवाड्याच्या या भागातून चार मुख्यमंत्री आणि दोन गृहमंत्री झाले. पण काँग्रेसने तेथे काहीच काम केले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६० दिवसांत बैठकीपासून ते भूमिपूजनापर्यंत सारे करून दाखवल्याबद्दल त्यांची प्रशंसा करावीच लागेल. सप्टेंबरपर्यंत कारखान्याचे काम सुरू होईल. त्याचप्रकारे मराठवाड्यात सिंचन योजनांना अधिक गती दिली जाईल. त्यामुळे आगामी ३० ते ५० वर्षांत येथे पाण्याची टंचाई जाणवणार नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसpiyush goyalपीयुष गोयल