शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

Raj Thackeray Live Updates: कोरोना लाट महाराष्ट्रातच का वाढतेय? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 11:56 IST

Raj Thackeray Press Conference on Coronavirus: आमदार, खासदारांनी फोन केल्यावर बेड्स उपलब्ध करून देणार. हॉस्पिटलला सरकारने जाणीव करून द्यावी. आमची जाणीव करून द्यायची पद्धत वेगळी आहे. पण सध्या ती वेळ नाही असा इशारा त्यांनी दिला.

ठळक मुद्देमी मागेही सांगितलं होतं, बाहेरून येणाऱ्या माणसांची कोरोना चाचणी करावी असं सांगितलं होतं, परंतु सरकारने ते केलं नाहीमहाराष्ट्रातील नागरिक घरात अडकून पडतोय, त्यामुळे सगळ्या लोकांची वाताहत होणं हे चांगले लक्षण नाही.शाळा बंद आहेत मग फी आकारणी का होतेय? शाळांनी फी घेऊ नये. मुलांचं वर्ष फुकट जात आहे.

मुंबई – राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिनी लॉकडाऊन आणि अनिल देशमुख यांचा राजीनामा यासह विविध विषयांवर राज ठाकरेंनी भाष्य केले. आधी जो कोविड आला त्यापेक्षा दुसरी कोरोनाची लाट भयंकर आहे, पण हे महाराष्ट्रातच का वाढतेय? महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांची संख्याही जास्त आहे. शेतकरी मोर्चा, पश्चिम बंगाल निवडणूक सुरू आहेत. तिथे कोरोनाची लाट पसरलीय हे दिसत नाही, पण महाराष्ट्रात कोरोना लाट सर्वाधिक पसरतेय हे दिसतंय. बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणारी माणसं आणि दुसऱ्या राज्यात कोरोना रुग्ण मोजले जात नसल्याने त्यांची आकडेवारी समोर येत नाही. त्याठिकाणी कोरोना असेल तर पण संख्या समोर येत नाही असं राज ठाकरेंनी सांगितले.

पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये बेड्स असून कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. महापालिकेच्या सवलती मिळूनही हॉस्पिटल अशाप्रकारे प्रकार करत आहेत. ग्लोबल हॉस्पिटलमध्ये १ हजार बेड्स दाखवतात आणि कोणी गेले तर रुग्णांना बेड्स देत नाही. सामान्य नागरिकांना बेड्स उपलब्ध होत नाहीत. आमदार, खासदारांनी फोन केल्यावर बेड्स उपलब्ध करून देणार. हॉस्पिटलला सरकारने जाणीव करून द्यावी. आमची जाणीव करून द्यायची पद्धत वेगळी आहे. पण सध्या ती वेळ नाही असा इशारा त्यांनी दिला.

तसेच मी मागेही सांगितलं होतं, बाहेरून येणाऱ्या माणसांची कोरोना चाचणी करावी असं सांगितलं होतं, परंतु सरकारने ते केलं नाही. आपण या सगळ्या गोष्टीला बंधन घालत नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक घरात अडकून पडतोय, त्यामुळे सगळ्या लोकांची वाताहत होणं हे चांगले लक्षण नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे भेटीची विनंती केली होती, परंतु त्यांच्या आसपासच्या अनेक लोकांना कोरोना झाल्यानं मुख्यमंत्रीही क्वारंटाईन आहेत, त्यामुळे झूमवर आमचं बोलणं झालं. पुन्हा एकदा लॉकडाऊन असं लोकांमध्ये पसरलं, रुग्णसंख्या वाढतेय. मी तक्रारींचा पाढा वाचला नाही तर सूचनांचा पाढा वाचला असं राज ठाकरेंनी सांगितलं.

राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलेल्या सूचना

छोटे उद्योजक, व्यापारी यांना उत्पादन करण्यास सांगितलं आणि विक्रीवर बंदी आणली, मग त्यासाठी आठवड्यातून किमान २-३ दिवस छोटे व्यापारी, दुकानं उघडी ठेवली पाहिजे.

लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद आहे, लोकांकडे पैसे नाही. त्यात बँका कर्जासाठी दबाव टाकत आहे. अनेक ठिकाणी सक्तीनं लोकांकडून पैसे वसूल केले जात आहे. त्याबाबत बँकांना सूचना द्यावी

सरसकट लॉकडाऊन काळात वीजबिल माफ करणे, व्यावसायिकांना ५० टक्के जीएसटी करात सवलत द्यावी यासाठी केंद्र सरकारशी बोलावं, लोकांना दिलासा देणं महत्त्वाचं आहे. सतत लॉकडाऊन लावणं योग्य होणार नाही.

कंत्राटी कामगारांना लॉकडाऊन काळात घेतलं. पण कोरोना लाट ओसरली त्यानंतर त्यांना कामावरून काढून घेतलं. या कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घ्यावं पण त्यांना काढू नये.

क्रिडा, मनोरंजन क्षेत्रात जे कलाकार, खेळाडू यांच्यासाठी सवलत असणं गरजेचे आहे. सराव करण्यासाठी परवानगी द्यावी. सरकारच्या तिजोरीची अवस्था सगळ्यांना माहिती आहे. पण शेतकऱ्यांना हमीभावासाठी पैसे द्यावेत

शाळा बंद आहेत मग फी आकारणी का होतेय? शाळांनी फी घेऊ नये. मुलांचं वर्ष फुकट जात आहे. १०, १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढे ढकललं पाहिजे. लहान मुलांच्या आयुष्यावर परिणाम होत आहे. १० वी, १२ वी परीक्षा न घेता त्यांना पास करावं. विद्यार्थ्यांचा विचार करताय तसा शाळांमधील कर्मचाऱ्यांचाही विचार व्हावा अशा विविध मागण्या राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(CM Uddhav Thackeray) केल्या आहेत

पाहा व्हिडीओ

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरे