राहुल गांधींवर पाटणा, दिल्लीत खटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 04:33 IST2019-04-19T04:31:36+5:302019-04-19T04:33:34+5:30

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात दिवाणी न्यायालयात बदनामीचा फौजदारी खटला दाखल केला.

Rahul Gandhi's lawsuit in Patna, Delhi | राहुल गांधींवर पाटणा, दिल्लीत खटले

राहुल गांधींवर पाटणा, दिल्लीत खटले

पाटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात दिवाणी न्यायालयात बदनामीचा फौजदारी खटला दाखल केला. दिल्लीच्या पटियाला हाउस न्यायालयातही जोगिंद्र तुली या व्यक्तीनेही खटला दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी १३ एप्रिल रोजी बंगळुरू येथील सभेत मोदी नावाची प्रत्येक व्यक्ती चोर कशी काय, असे विधान केले होते. त्यावर सुशीलकुमार मोदी यांनी आक्षेप घेतला. या उद्गारांमुळे समाजात आपली प्रतिमा मलिन झाली. हे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे आहे, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

Web Title: Rahul Gandhi's lawsuit in Patna, Delhi