शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

राहुल गांधी अचानक परदेशी का गेले?; खासदार सातव यांनी सांगितलं कारण

By कुणाल गवाणकर | Published: December 28, 2020 12:47 PM

काँग्रेसच्या स्थापना दिनाला राहुल गांधी अनुपस्थित; भाजप नेत्यांकडून टीकास्त्र

नवी दिल्ली: काँग्रेसच्या १३६ व्या स्थापना दिनानिमित्त आज पक्षाकडून देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी परदेशात गेले आहेत. त्यावरून भारतीय जनता पक्षाकडून राहुल गांधींना लक्ष्य करण्यात येत आहे. भाजपकडून होत असलेल्या टीकेला काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.राहुल गांधींची आजी आजारी आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं राहुल गांधी देशाबाहेर गेले आहेत. आपल्या घरातील एखादी व्यक्ती, नातेवाईक आजारी असल्यास आपण सर्व काही सोडून त्यांच्यासाठी धावून जातो, असं राजीव सातव यांनी सांगितलं. 'दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना राहुल गांधी परदेशात गेल्याचं भाजप नेते म्हणतात. पण पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसोबत चर्चा करत नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाताहत झाली आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पण तरीही मोदी याबद्दल चकार शब्द काढत नाहीत,' अशा शब्दांत सातव यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.देशावर कोरोनाचं संकट येणार असा धोक्याचा इशारा राहुल गांधींनी फेब्रुवारी महिन्यातच दिला होता. पण राहुल यांनी सतर्कतेचा इशारा देऊनही सरकारनं काय केलं?, असा सवाल सातव यांनी उपस्थित केला. सगळे प्रश्न राहुल यांना विचारले जातात. पण पंतप्रधान ६ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेत नाहीत, असं सातव म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना सक्तवसुली संचलनालयानं नोटीस पाठवली आहे. त्यावरूनही सातव यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. भाजप, केंद्र सरकारच्या विरोधात बोललं की ईडी, सीबीआयच्या नोटीस येतात. भाजप नेत्यांना मात्र कधीही ईडी, सीबीआय नोटीस बजावत नाही. ईडी, सीबीआयनं आता त्यांचं कार्यालय भाजप कार्यालयात हलवावं. म्हणजे त्यांचा संवाद जास्त चांगला राहील, असा चिमटा सातव यांनी काढला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीRajeev Satavराजीव सातवBJPभाजपा