"मी भ्रष्ट नाही, त्यामुळेच भाजपावाले माझ्यावर दिवसभर टीका करतात"
By बाळकृष्ण परब | Updated: February 27, 2021 15:34 IST2021-02-27T15:32:58+5:302021-02-27T15:34:49+5:30
Rahul Gandhi Criticize Narendra Modi & BJP :

"मी भ्रष्ट नाही, त्यामुळेच भाजपावाले माझ्यावर दिवसभर टीका करतात"
चेन्नई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तामिळनाडूमध्ये गेलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. (Rahul Gandhi Criticize Narendra Modi & BJP ) तसेच मी भ्रष्ट नाही. त्यामुळेच भाजपा दिवसाचे २४ तास माझ्यावर टीका करत असतात, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. (Rahul Gandhi Says, "I am not corrupt, that is why BJP criticizes me all day long.")
थुथुकुडी येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आमचे पंतप्रधान देशाच्या हितांशी तडजोड करतील हे चीनला माहिती होते. गेल्या सहा वर्षांमध्ये भाजपा आणि संघाने देशातील विविध संस्था आणि फ्री प्रेसवर पद्धतशीरपणे हल्ला केला. तसेच मी भ्रष्ट नाही. त्यामुळेच भाजपा दिवसाचे २४ तास माझ्यावर टीका करत असतात, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.
देशातील लोकशाही ही एका फटक्यात नष्ट होणार नाही. तर ती हळूहळू संपुष्टात येते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विविध संस्थामधील संपुष्टात आणले आहे. यावेळी राहुल गांधी यांनी महिलांच्या आरक्षणाबाबतही भूमिका मांडली. न्यायपालिका आणि संसदेमध्ये महिलांना आरक्षण मिळावे असे माझे मत आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
यावेळी राहुल गांधी यांनी रिलायन्स आणि अदानीला मोदी सरकार फायदा पोहोचवत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की, प्रश्न हा नाही आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपयुक्त आहेत की, व्यर्थ आहेत. पण मोदी हे दोन व्यक्तींसाठी खूप उपयुक्त आहेत. हम दो हमादे दो हे लोक पंतप्रधानांचा वापर आपली संपत्ती वाढवण्यासाठी करत आहेत. त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपयुक्त आहेत आणि गरीबांसाठी निरुपयोगी आहेत, असा घणाघातही राहुल गांधी यांनी केला.