राहुल गांधी हे सक्षम, संयमी व संवेदनशील नेते; काँग्रेसचं नेतृत्व त्यांनीच करावं – मंत्री अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 03:16 AM2020-08-24T03:16:50+5:302020-08-24T03:18:07+5:30

पक्षाला एकजीव ठेवण्याची, बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे आणि इतिहासातही हे अनेकदा सिद्ध झाले आहे.

Rahul Gandhi is a capable, restrained, sensitive leader; He should lead the Congress - Ashok Chavan | राहुल गांधी हे सक्षम, संयमी व संवेदनशील नेते; काँग्रेसचं नेतृत्व त्यांनीच करावं – मंत्री अशोक चव्हाण

राहुल गांधी हे सक्षम, संयमी व संवेदनशील नेते; काँग्रेसचं नेतृत्व त्यांनीच करावं – मंत्री अशोक चव्हाण

Next

मुंबई  - काँग्रेस अध्यक्षपदावरून सध्या पक्षांतर्गत वादविवाद निर्माण होताना दिसत आहे. गांधी कुटुंबाव्यतिरिक्त दुसऱ्याला अध्यक्ष पद द्यावं अशी भूमिका सोनिया गांधी आणि राहुल यांनी घेतली आहे. परंतु काँग्रेस नेत्यांमध्येच याबाबत वेगवेगळी मते आहेत. यातच मंत्री अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांनीच काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं अशी मागणी केली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले की, भारताची एकता, अखंडता तसेच प्रगतीमध्ये नेहरू-गांधी कुटुंबाने दिलेले योगदान अपूर्व आहे. देश व काँग्रेस पक्ष संघटित ठेवण्यासाठी पुढील काळातही त्यांच्या सक्रिय नेतृत्वाची नितांत गरज आहे. पक्षाला एकजीव ठेवण्याची, बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे आणि इतिहासातही हे अनेकदा सिद्ध झाले आहे. या वास्तवाची जाणिव ठेवूनच पक्षाची पुढील वाटचाल झाली पाहिजे असं त्यांनी सांगितले.

तसेच पक्षाच्या अध्यक्ष पदासंदर्भात काँग्रेस कार्यसमिती निर्णय घेईल. परंतु, खा. राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारावे, अशी कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे. राहुल गांधी हे सक्षम, संयमी व संवेदनशील नेते आहेत. सर्वसामान्यांच्या व्यथांना त्यांनी नेहमीच अत्यंत दूरदर्शीपणे व नेमकी वाचा फोडली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर व्यापक देशहिताची भूमिका परखडपणे मांडली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व त्यांनी करावे, ही आमची मागणी आहे असं अशोक चव्हाणांनी सांगितले.

दरम्यान, खा. सोनिया गांधी यांनी अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षाला उभारी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युपीए-१ आणि युपीए-२ च्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय देणारे, देशाला विकासाची नवी दिशा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले. कोणतीही महत्वाकांक्षा न बाळगता केवळ कर्तव्यभावनेतून त्यांनी देश व काँग्रेसची सेवा केली. त्यामुळे पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत त्या योग्य व सर्वमान्य निर्णय घेतील असा विश्वासही अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

Web Title: Rahul Gandhi is a capable, restrained, sensitive leader; He should lead the Congress - Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.