शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला आणखी धक्के बसणार?; विखे पाटलांसह चार आमदार पक्षाचा 'हात' सोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 18:55 IST

चारही आमदार भाजपामध्ये जाण्याची शक्यता

मुंबई: लोकसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव पत्कराव्या लागणाऱ्या काँग्रेसला आणखी धक्के बसण्याची शक्यता आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह चार आमदार पक्षाचा 'हात' सोडणार असल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं आहे. यामध्ये अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, नितेश राणेंचा समावेश आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात केवळ एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला आणखी धक्के बसणार आहेत. चार आमदारांनी पक्षाला रामराम केल्यास काँग्रेसला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद गमवावं लागू शकतं. लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीमुळे पक्षातील वरिष्ठ नेते राजीनामे देऊ लागले आहेत. देशातील 13 वरिष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधींकडे राजीनामे पाठवले आहेत. यामध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे. यानंतर आता काँग्रेसचे चार आमदार भाजपाच्या वाटेवर आहेत. यात विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद भूषवलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांचा समावेश आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटवर निवडूनदेखील आले आहेत.औरंगाबादचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. सत्तार लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक होते. मात्र पक्षानं त्यांना तिकीट दिलं नव्हतं. जूनमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसेल, असा इशारा त्यांनी एका व्हिडीओतून दिला आहे. तर मुंबईतील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लावून पक्ष सोडणार असल्याचे संकेत दिले होते. ते लवकरच काँग्रेसला रामराम करुन भाजपात प्रवेश करू शकतात. तर नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणेदेखील भाजपात जाऊ शकतात. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष असलेल्या नारायण राणेंना भाजपानं राज्यसभेवर पाठवलं आहे. यासोबतच माणचे आमदार जयकुमार गोरेदेखील काँग्रेसला हात दाखवून हातात कमळ धरू शकतात. 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलKalidas Kolambkarकालीदास कोळंबकरJaykumar Goreजयकुमार गोरेAbdul Sattarअब्दुल सत्तारcongressकाँग्रेसBJPभाजपा