Rada on stage in front of Tejaswi Yadav; Jangalraj's video goes viral | तेजस्वी यादव यांच्या समोरच मंचावर राडा; जंगलराजचा व्हिडीओ व्हायरल

तेजस्वी यादव यांच्या समोरच मंचावर राडा; जंगलराजचा व्हिडीओ व्हायरल

बिहारच्या वैशाली मतदारसंघात प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी पोहोचलेल्या राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या मंचावर मोठा राडा पहायला मिळाला. सभेचे सूत्रसंचालन कोण करणार यावरून नेते एकमेकांना भिडले आणि हाणामारी सुरु झाली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होऊ लागला आहे. 


वैशालीतून राजदच्या उमेदवार वीणा देवी उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्या प्रचारासाठी तेजस्वी यादव आले होते. तेजस्वी मंचावर येताच स्वागत प्रक्रिय सुरु झाली. यावेळी राजदचे नेते उपस्थित होते. 
स्वागत संपल्यानंतर मंचावर सूत्रसंचालन कोण करणार यावरून वाद सुरु झाला. या वादातून राजदचे नेते एकमेकांना भिडले. यानंतर तेजस्वी यादव यांच्यासमोरच हाणामारी सुरु झाली. या झटापटीत काही नेते मंचावरून खाली पडले. तर काही जण तेथून पसार झाले. 


या भांडणानंतर मंचावर पळापळ झाली होती. वरिष्ठ नेते दोन्ही बाजुच्या नेत्यांना शांत राहण्यास सांगत होते. मात्र, कोणाही ऐकण्यास तयार नव्हते. 
यानंतर काही नेत्यांनी दोन्ही बाजुच्या नेत्यांना समजावले आणि हाणामारी थांबविली. या नेत्यांनी यावर कोमतीही प्रतिक्रिया दिली नाही. 
या हाणामारीचा व्हिडीओ लोकांनी बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यामुळे जंगलराजचा आरोप असलेल्या राजदवर नामुष्कीची वेळ आली आहे. 

Web Title: Rada on stage in front of Tejaswi Yadav; Jangalraj's video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.