शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
3
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
4
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
5
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
6
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
7
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
8
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
9
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
10
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
11
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
12
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
13
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
14
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
15
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
16
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
17
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
18
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

तुम्ही ‘योगी’ असल्याचे २४ तासांत सिद्ध करा, ओवेसींचे आदित्यनाथांना आव्हान

By बाळकृष्ण परब | Published: October 22, 2020 3:16 PM

Yogi Adityanath News : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे.

लखनौ - बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार रंगात आला असतानाच आरोप-प्रत्यारोपांनाही जोर आला आहे. त्याचदरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जमुई मतदारसंघात एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींवर टीका केली होती. ओवेसी आणि राहुल गांधी पाकिस्तानची प्रशंसा करतात, असा आरोप योगींनी केला होता. आता ओवेसींनी त्याला प्रत्युत्तर देत योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला केला आहे.योगींना प्रत्युत्तर देताना ओवेसी म्हणाले की, मी योगी आदित्यनाथ यांना आव्हान देतो की, त्यांनी २४ तासांत ते खरे योगी असल्याचे पुनावे द्यावेत. त्यांनी वैफल्यग्रस्ततेतून माझ्यावर आरोप केले आहे. मी पाकिस्तानमध्ये गेलो होतो आणि तिथे मी भारतीय लोकशाहीवर बोललो होतो हे त्यांना माहीत नाही का, असा सवाल ओवेसींनी विचारला.

योगी आदित्यनाथ यांनी जमुई येथील भाजपा उमेदवार श्रेयसी सिंह यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती. त्यावेळी मतदारांना संबोधित करताना योगी म्हणाले होते की, राहुल गांधी आणि ओवेसी हे पाकिस्तानचे कौतुक करत आहेत. तुम्ही या दोघांकडून देशहिताची कल्पना करू शकता का. हे दोघे देशाचं हित साधणार का. देशाचा शत्रू असलेला देश जो भारतामध्ये दहशतवादी कारवाया करतोय. अशा देशाच्या हिताची गोष्ट करणाऱ्याकडून काय अपेक्षा ठेवता येईल? तसेच काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर राहुल गांधी आणि ओवेसी यांना त्रास झाला, असाही दावा योगी आदित्यनाथ यांनी केला होता.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकyogi adityanathयोगी आदित्यनाथAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी