शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
4
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
5
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
6
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
7
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
8
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
9
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
10
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
11
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
12
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
13
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
14
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
15
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
16
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
17
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
18
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
19
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
20
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान

Pooja Chavan: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेले कोण आहेत मंत्री संजय राठोड?

By प्रविण मरगळे | Updated: February 13, 2021 11:14 IST

Who is Sanjay Rathod? Name involve in Pooja Chavan Suicide Case: १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती.

ठळक मुद्देपूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतातभाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी थेट संजय राठोड यांंचं नाव घेऊन ठाकरे सरकारवर केली टीका आक्रमक शिवसैनिक ते कॅबिनेट मंत्री कसा होता संजय राठोड यांचा राजकीय प्रवास?

मुंबई – पुण्यातील २२ वर्षीय तरूणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत, काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप लागले होते, हे प्रकरण संपत नाही तोवरच या मुलीच्या आत्महत्येवरून आणखी एक कॅबिनेट मंत्री अडचणीत सापडले आहेत. या कथित मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून तरूणीने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपाने केला आहे, नेमकं हा मंत्री कोण? अशी चर्चा सोशल मीडियात सुरू होती. (In Pooja Chavan Suicide Case allegation on Minister Sanjay Rathod)

परंतु भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ(BJP Chitra Wagh) यांनी थेट संजय राठोड या मंत्र्यांचे नाव घेऊन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राठोड हे राज्यातील ठाकरे सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आहे, यवतामळमधील शिवसेनेचे आमदार आणि राज्यातील मंत्रिमंडळात वनमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. संजय राठोड यांचे नाव पहिल्यांदाच उघडपणे या प्रकरणात समोर येत आहे. बंजारा समाजाचे नेते म्हणून संजय राठोड यांची ओळख आहे, त्याचसोबत यवतमाळमध्ये शिवसेनेचा(ShivSena) भगवा फडकवणारे आक्रमक शिवसैनिक म्हणूनही त्यांना ओळखलं जातं.

“दरवाजा तोड अन् मोबाईल ताब्यात घे”; ‘ती’च्या आत्महत्येनंतर कथित मंत्र्याचा कार्यकर्त्याला आदेश

कोण आहेत संजय राठोड? (Who is Sanjay Rathod)

महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड यांनी वनमंत्री म्हणून शपथ घेतली.

यवतमाळ जिल्हा काँग्रेसमय असताना बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित होऊन संजय राठोड शिवसेनेत आले.

१९९० ते २००० दरम्यान यवतमाळ मध्ये तरूण तडफदार चेहरा म्हणून शिवसेनेचं काम केले.

यवतमाळमध्ये काँग्रेसचं वर्चस्व असताना वयाच्या २७ व्या वर्षी शिवसेनेचं यवतमाळ जिल्हाप्रमुखपद त्यांना मिळालं.

१९९७ पासून ते २००४ पर्यंत कठीण संघर्षातून संजय राठोड यांनी यवतमाळमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवला, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून ते पहिल्यांदाच विधानसभेत पोहचले.

२००९ मध्ये दिग्रस मतदारसंघातून बाजी मारत काँग्रेसच्या संजय देशमुखांचा पराभव केला, २०१४ मध्ये पुन्हा निवडून येत संजय राठोड यांनी विजयाची हॅट्रिक साधली, तर २०१९ मध्येही संजय देशमुख यांचा पराभव करून पुन्हा आमदार झाले.  

संजय राठोड हे कायम राजकीय भूमिकांपेक्षा वैयक्तिक आयुष्यात चर्चेत राहिले, कधी डान्स तर कधी सायकल चालवणं,तर विजयानंतर उदयनराजेंसारखी कॉलर उडवलेली दृश्य पाहायला मिळाली.

कोण आहे पूजा चव्हाण?

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.

मोबाईल, लॅपटॉपमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी

आत्महत्या केलेल्या मुलीच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह माहिती सापडली आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. त्यामध्ये काय आहे हे पोलिसांनी जाहीर करावे, नाहीतर दोन-तीन दिवसांत याची माहिती बाहेर येईलच असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

पाहा व्हिडीओ 

 

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडPooja Chavanपूजा चव्हाणShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस