शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Pooja Chavan suicide Case : संजय राठोड यांचा पाय आणखी खोलात; मंत्रिपदाचा राजीनामा देणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 08:29 IST

Pooja Chavan suicide case, Shiv Sena leader Sanjay Rathore in trouble : पूजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्महत्येवरून शिवसेना नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड हे चांगलेच अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देसंजय राठोड हे मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चासंजय राठोड हे गुरुवारी पोहरादेवी येथून राजीनाम्याची घोषणा करणार असल्याची शक्यता आरोप सुरू झाल्यापासून संजय राठोड हे थेटपणे समोर आलेले नाहीत

मुंबई - गेल्या आठवड्यात पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीने पुण्यात केलेल्या आत्महत्येवरून शिवसेना (Shiv Sena) नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore)  हे चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणात आरोप झाल्यापासून संजय राठोड हे बेपत्ता असून, राजीनाम्यासाठी दबाव वाढत असल्याने ते गुरुवारी राजीनामा देण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. (Pooja Chavan suicide case)पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर या प्रकरणाविषयी सोशल मीडियावर दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून या प्रकरणावर संजय राठोड यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला. दरम्यान, हे आरोप सुरू झाल्यापासून संजय राठोड हे थेटपणे समोर आलेले नाहीत. मात्र विरोधकांकडून तसेच पक्षामधील एका गटाकडूनही दबाव वाढल्याने आता संजय राठोड हे मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. संजय राठोड हे गुरुवारी पोहरादेवी येथून राजीनाम्याची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.दरम्यान, संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक झालेले असतानाच शिवसेनेमधील एक गटही त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहे. पक्ष किंवा सरकार अडचणीत येत असेल तर राजीनामा घेऊन ठेवावा असाही एक मतप्रवाह पक्षात पाहायला मिळत आहे. संजय राठोड यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे. बंजारा सामाजाची आणि पूजा चव्हाणच्या कुटुंबियांनी संजय राठोड यांना क्लिन चीट दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील द्वीधा मनःस्थितीत असल्याचे दिसून येत आहे.दुसरीकडे  शिवसेनेचा एक बडा नेता आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच धनंजय मुंडे प्रकरणात त्यांच्याकडून राजीनामा घेतला नाही तर मग संजय राठोड यांना तरी राजीनामा द्यायला का लावायचं, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शिवाय असं झालं तर वेगवेगळ्या मुद्यांवर विरोधक राजीनामे मागत सुटतील असा शिवसेनेते एक मतप्रवाह आहे. ऑडिओ क्लिपमधील आवाज पूजा चव्हाणचा नाहीपूजाच्या आत्महत्येसंदर्भात ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. त्यातील आवाज पूजाचा नाही. पूजाच्या मृत्यूप्रकरणी आपली कोणाविरोधातही तक्रार नाही, कुणाविषयी शंका नाही. त्यामुळे आमची आणि समाजाची बदनामी करून आम्हाला वेदना देऊ नका, अशी विनंती लहू चव्हाण यांनी केली आहे. या प्रकरणात ज्यांचे नाव जोडले जात आहे, ते मंत्री संजय राठोड हे पूजाच्या वडिलांसारखे आहेत, असे लहू चव्हाण ह्यलोकमतह्णशी बोलताना म्हणाले आहेत.मोबाईल, लॅपटॉपमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टीआत्महत्या केलेल्या मुलीच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह माहिती सापडली आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. त्यामध्ये काय आहे हे पोलिसांनी जाहीर करावे, नाहीतर दोन-तीन दिवसांत याची माहिती बाहेर येईलच, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.कोण आहे पूजा चव्हाण?पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासा

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSuicideआत्महत्याSanjay Rathodसंजय राठोडShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण