Pooja Chavan : नितेश राणे आक्रमक, म्हणाले, "जे दिशा बरोबर झाले, तेच पूजाबरोबर होणार असेल तर…’’

By बाळकृष्ण परब | Published: February 13, 2021 11:45 AM2021-02-13T11:45:32+5:302021-02-13T11:47:41+5:30

Pooja Chavan Suicide Case : पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर नितेश राणेंनी ट्विट करून या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Pooja Chavan Suicide Case : Nitesh Rane is aggressive, says, "So what is the use of Shakti Law law" | Pooja Chavan : नितेश राणे आक्रमक, म्हणाले, "जे दिशा बरोबर झाले, तेच पूजाबरोबर होणार असेल तर…’’

Pooja Chavan : नितेश राणे आक्रमक, म्हणाले, "जे दिशा बरोबर झाले, तेच पूजाबरोबर होणार असेल तर…’’

googlenewsNext

मुंबई - पुण्यामध्ये पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीच्या कथित आत्महत्या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर आरोप झाले असून, त्यावरून राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता शिवसेनेचे (Shiv Sena) कट्टर शत्रू असलेल्या राणे कुटुंबीयांमधील नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. (Pooja Chavan Suicide Case)

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर नितेश राणेंनी ट्विट करून या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, राज्याच्या राजकारणात जे दिशाबरोबर झाले तेच पूजाबरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही? 



पुण्यामधील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने रविवारी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावरून उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर या प्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री असलेले संजय राठोड यांचे नाव समोर आले होते. संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे.

कोण आहे पूजा चव्हाण?
पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.

मोबाईल, लॅपटॉपमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी
आत्महत्या केलेल्या मुलीच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह माहिती सापडली आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. त्यामध्ये काय आहे हे पोलिसांनी जाहीर करावे, नाहीतर दोन-तीन दिवसांत याची माहिती बाहेर येईलच असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

Web Title: Pooja Chavan Suicide Case : Nitesh Rane is aggressive, says, "So what is the use of Shakti Law law"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.