शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

Pooja Chavan: बेपत्ता मंत्री संजय राठोड मंगळवारी पोहरादेवीला येणार; महंतांच्या बैठकीत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 18:05 IST

Sanjay Rathod will come to Poharadevi : दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी संजय राठोड गुरुवारी प्रसारमाध्यमांसमोर येणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे, असे सांगितले होते. मात्र, राठोड काही आले नाहीत. संजय राठोड गायब नाहीत, ते संपर्कात आहेत. संजय राठोड गुरुवारी समोर येऊन स्पष्टीकरण देतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली होती. 

मुंबई : मुळची परळी येथील परंतू इंग्लिश स्पिकिंग कोर्ससाठी पुण्यात असलेल्या टिकटॉकस्टार पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यावरून राज्यात मोठे वातावरण तापले आहे. यामध्ये शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने भाजपाने टीकेची झोड उठविली आहे. यामुळे राठोड गेल्या 10-12 दिवसांपासून नॉट रिचेबल असून सरकारमधील काही लोकांच्या संपर्कात आहेत. पोलीस कारवाई, तपास सुरु आहे. अशातच राठोड केव्हा बाहेर येणार या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. (Shivsena minister Sanjay Rathod will come on 23 feb at Poharadevi. )

दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी संजय राठोड गुरुवारी प्रसारमाध्यमांसमोर येणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे, असे सांगितले होते. मात्र, राठोड काही आले नाहीत. संजय राठोड गायब नाहीत, ते संपर्कात आहेत. संजय राठोड गुरुवारी समोर येऊन स्पष्टीकरण देतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली होती. 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोपानंतर संजय राठोड हे गायब झाले आहेत. त्यांचा फोनही लागत नाही. मुंबई आणि यवतमाळमधील त्यांच्या निवासस्थानीही ते नाहीत. त्यामुळे संजय राठोड नेमके आहेत कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच- सहा दिवसांपासून संजय राठोड नॉट रिचेबल आहेत. मात्र, आज मंत्रालयात त्यांच्या कार्यालयातील प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू आहे. त्यामुळे संजय राठोड हे कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.आज वाशिमच्या पोहरादेवी येथे धर्मपीठावर महंतांची बैठक पार पडली. असलेले वनमंत्री संजय राठोड हे सहपरिवार 23 फेब्रुवारीला पोहरादेवी येथे धर्मपीठावर येणार आहेत. या संदर्भातील माहिती महंत जितेंद्र महाराज व सुनील महाराज यांनी आज माध्यमांशी बोलतांना दिली. यामुळे अखेर राठोड लोकांसमोर येणार आहेत. परंतू ते पूजा चव्हाण प्रकरणी काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. 

वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेल्या संत सेवालाल महाराज, आई जगदंबामाता आणि राष्ट्रीय संत डॉ. रामराव महाराज यांच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येथे हजेरी लावतात.

कोण आहे पूजा चव्हाण?

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोडPoliceपोलिस