शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

Pooja Chavan Suicide Case: “मी मर्द आहे’ हे वाक्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परत कधीही भाषणात म्हणू नये”

By प्रविण मरगळे | Published: February 25, 2021 1:16 PM

Pooja Chavan Suicide Case: BJP NIlesh Rane Criticized CM Uddhav Thackeray over Sanjay Rathod allegation: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढत असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, शिस्त पाळावी, गर्दी करू नये असं आवाहन केले होते,

ठळक मुद्देशिवसेना मंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हजारोंच्या संख्येने शक्तीप्रदर्शन केलेठाकरे सरकार संजय राठोडला वातवतंय, सगळ्या बाजूने अडकलेला संजय राठोड शक्तीप्रदर्शन करतोकॅबिनेट मिटिंगमध्ये बसतो, पण तरीही राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यांमध्ये नाही

मुंबई – पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या(Pooja Chavan Suicide Case) प्रकरणाने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना मंत्री संजय राठोड(Sanjay Rathod) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपाने वारंवार लावून धरली आहे, यातच १५ दिवस गायब असलेले मंत्री राठोड यांनी पोहरादेवी गडावर शक्तीप्रदर्शन करत त्यांच्यावरील आरोपाचं स्पष्टीकरण दिलं.(BJP Nilesh Rane Target CM Uddhav Thackeray over Sanjay Rathod allegation in Pooja Chavan Suicide Case)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढत असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, शिस्त पाळावी, गर्दी करू नये असं आवाहन केले होते, मात्र त्याचनंतर शिवसेना मंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हजारोंच्या संख्येने शक्तीप्रदर्शन केले, यावरून भाजपा सचिव निलेश राणेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. निलेश राणे म्हंटले की, ठाकरे सरकार संजय राठोडला वातवतंय, सगळ्या बाजूने अडकलेला संजय राठोड शक्तीप्रदर्शन करतो, कॅबिनेट मिटिंगमध्ये बसतो, पण तरीही राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यांमध्ये नाही, परत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कधीही स्वत:च्या भाषणात मी मर्द आहे असं म्हणू नये असा टोला त्यांनी लगावला आहे.

तसेच पूजा चव्हाण प्रकरणात चित्रा वाघ या वानवडी पोलीस स्टेशनला जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या, पोलिसांनी त्यांना दिलेली वागणूक बघून आश्चर्य वाटले, एक गुन्हेगार मंत्र्याला वाचवण्यासाठी पोलीस किती तत्पर आहेत यावरून लक्षात आलं अशा शब्दात निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची परीक्षा

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या(CM Uddhav Thackeray) निर्णय क्षमतेची परीक्षा आहे, मुख्यमंत्री म्हणून आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना अभय द्यायचा की, या महाराष्ट्रात पक्षाबद्दल, लोकशाहीविषयी लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा. हा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

 संजय राठोडांवर राजीनाम्याची टांगती तलवार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड नाराज?

मी गायब नव्हतो, बदनामी थांबवा

मी गायब नव्हतो, तर आई-वडील म्हातारे असल्यामुळे त्यांना व पत्नीला धीर देण्यासाठी बंगल्यावर होतो. आता पोहरादेवीचे दर्शन करून पूर्ववत कामाला लागणार आहे. मागासवर्गीयांचा नेता असल्यामुळे माझ्यावर घाणेरडे आरोप करून माझे आयुष्य उद्‌ध्वस्त करण्याचे राजकारण केले जात आहे. माझी व समाजाची बदनामी थांबवा असं आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची परीक्षा; नेत्याला अभय देणार की लोकांमध्ये विश्वास निर्माण करणार?”

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNilesh Raneनिलेश राणे Sanjay Rathodसंजय राठोडUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाPooja Chavanपूजा चव्हाण