शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Pooja Chavan Death Case: ...म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला; संजय राठोडांनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 16:41 IST

Pooja Chavan Death Case: मुख्यमंत्री ठाकरेंकडे वनमंत्री संजय राठोड यांनी सोपवला राजीनामा

मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी ठाकरे सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे. राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशनात सरकारला बोलू देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आला होता. (Shiv Sena Minister Sanjay Rathod Resigns)मोठी बातमी! अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामाउद्यापासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) भेट घेतली. या बैठकीला संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, खासदार अनिल देसाई उपस्थित होते. या बैठकीनंतर राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'मी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे. आमच्या बंजारा समाजातील तरुणी पूजा चव्हाणचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यावरून विरोधकांनी राज्यात अतिशय घाणेरडं राजकारण केलं,' असं राठोड म्हणाले.'पूजा चव्हाण प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. मला राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी हीच माझी मागणी आहे. तसं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. तपास होऊ द्या, त्यातून सत्य बाहेर येऊ द्या, अशी भूमिका मी आधीपासूनच केली होती. पण विरोधकांनी अधिवेशन चालू देणार असे इशारे दिले. म्हणून मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला,' असं राठोड यांनी माध्यमांना सांगितलं.राठोड यांना मुख्यमंत्री काय म्हणाले?वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला. 'पूजा चव्हाण प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत आहे. विरोधकांसोबतच स्वकीयांनीदेखील पक्षावर दबाव टाकला आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे. अहवाल येणं बाकी आहे. त्यामुळे तूर्तास राजीनामा द्या. आपण लवकरच निर्णय घेऊ. आता राजीनामा द्या. निर्दोष असाल तर पुढे विचार करू,' असं मुख्यमंत्र्यांनी वर्षावरील बैठकीत राठोड यांना सांगितल्याचं वृत्त 'एबीपी माझा'नं दिलं आहे.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडPooja Chavanपूजा चव्हाणUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा