शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Pooja Chavan Death Case: संजय राठोडांचा राजीनामा तडकाफडकी घेऊ नका; मुख्यमंत्री ठाकरेंवर महंतांचा दबाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 12:11 IST

Pooja Chavan Death Case: विरोधी पक्षाकडून राठोड यांच्या राजीनाम्यासाठी दबाव; पोहरादेवीतल्या महंतांकडून राजीनामा न घेण्याची विनंती

वाशीम/मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) दबाव वाढला आहे. भारतीय जनता पक्षानं राठोड यांच्या राजीनाम्यासाठी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर आता राठोड यांनी राजीनामा घेतला जाऊ नये यासाठी पक्षावर दबाव आणण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली आहे.छत्रपती शिवराय, राजदंड अन् राजधर्म! संजय राऊतांचं सूचक ट्विट; आज राठोड राजीनामा देणार?संजय राठोड यांचा राजीनामा तडकाफडकी घेतला जाऊ नये, अशी विनंती पोहरादेवीच्या महंतांकडून केली जात आहे. राठोड यांचा राजीनामा घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी, असं आवाहन महंतांकडून करण्यात आली आहे. 'पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आधी चौकशी होऊ द्या. दोषी आढळून येईपर्यंत त्यांचा राजीनामा घेऊ नका,' असं पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.राठोड यांचा राजीनामा घ्या, तरच होऊ देणार कामकाज; विरोधकांचा इशारा'आमच्याकडून, बंजारा समाजाकडून मुख्यमंत्री ठाकरेंवर दबाव टाकण्याचा कोणताही प्रयत्न नाही. उद्धव ठाकरे अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही त्यांचा आदर करतो. आम्ही केवळ समाजाची भावना मांडत आहोत. मुख्यमंत्री, सरकारवर दबाव टाकण्याचा आमचा हेतू नाही,' असं जितेंद्र महाराज यांनी स्पष्ट केलं. संजय राठोड पुन्हा पोहरादेवीला येऊ शकतात असंदेखील त्यांनी पुढे सांगितलं. 'राठोड पुन्हा पोहरादेवीला येणार असल्याचं आम्हाला त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजलं आहे. ते इथे आल्यास महंतांशी चर्चा करून पुढील वाटचालीबद्दल निर्णय घेतील,' असं महाराज म्हणाले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचं बोललं जात आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राज्य सरकारवर मोठी नामुष्की ओढवल्यानं शिवसेनेनं राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत कालच माध्यमांशी बोलताना राठोड यांच्या राजीनाम्याबद्दलचे संकेत दिले आहेत. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याप्रकरणी काही डोळे मिटून बसलेले नाही. ते लक्षपूर्वकपणे यावर निर्णय घेतील,' असं सूचक विधान राऊत यांनी केलं आहे.भाजपचा आक्रमक पवित्राराज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी संजय राठोड यांचा राजीनामा घ्या, नाहीतर अधिवेशन होऊ देणार नाही. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूजा चव्हाण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला. यासोबतच संपूर्ण राज्यभर भाजपकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनं करण्यात आली. 

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोडUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना