शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

“महाराष्ट्रात राजकीय भूकंप! खडसेंसोबत भाजपाचे अनेक आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत"

By प्रविण मरगळे | Published: October 21, 2020 1:22 PM

Jayant Patil Announced BJP Eknath Khadse will join NCP News: तसेच पुढील येणाऱ्या काळात अनेक भूकंप पाहायला मिळतील, एकनाथ खडसेंसोबत येण्यासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत.

ठळक मुद्देकोरोना काळात विधानसभा निवडणुका घेणं शक्य नसल्याने हळूहळू त्याबाबत निर्णय होईलखडसेंचे नेतृत्व मानणारे, भाजपाकडून ज्यांचा हिरमोड झाला आहे ते सगळी लोकं राष्ट्रवादीत येतीलमहाविकास आघाडीच्या कुटुंबात स्वागत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित झाला आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश होईल अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली. त्यामुळे भाजपाला राज्यात मोठा धक्का बसला आहे.

याबाबत जयंत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसेंनी भाजपाचा त्याग केलेला असल्याने शुक्रवारी दुपारी २ वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अनेक वर्षांचा अनुभवी नेता, राज्यातील विविध विषयाचा अभ्यास असणारा नेता राष्ट्रवादीत येत आहे, त्यांचे स्वागत आम्ही करतो. खडसेंच्या येण्याने राष्ट्रवादीला बळ मिळेल. राष्ट्रवादीकडून त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

तसेच पुढील येणाऱ्या काळात अनेक भूकंप पाहायला मिळतील, एकनाथ खडसेंसोबत येण्यासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. राजीनामा देऊन कोरोना काळात विधानसभा निवडणुका घेणं शक्य नसल्याने हळूहळू त्याबाबत निर्णय होईल. ज्यांना तांत्रिक अडचणी आहेत ते नंतर येतील, एकनाथ खडसेंसोबत कोण येणार याबाबत फारशी चर्चा केली नाही, खडसेंचे नेतृत्व मानणारे, भाजपाकडून ज्यांचा हिरमोड झाला आहे ते सगळी लोकं राष्ट्रवादीत येतील असंही जयंत पाटील यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या कुटुंबात आल्याचं स्वागत -मुख्यमंत्री

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने आनंद आहे. त्यांचे महाविकास आघाडीच्या कुटुंबात स्वागत आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंना काय मिळणार?

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवण्यात येईल, इतकचं नाही तर त्यानंतर मंत्रिमंडळात खडसेंचा समावेश करण्यासाठी चर्चा सुरु आहे, यात शिवसेना-राष्ट्रवादी खात्यांची अदलाबदल करून एकनाथ खडसेंना कृषिमंत्री पद देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.

 

काय म्हणाले होते शरद पवार?

एकनाथ खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. खडसेंचं भाजपच्या उभारणीत मोठं योगदान आहे. विरोधकांच्या बाजूने एकनाथ खडसे प्रखरतेने दिसत होते, पण दुर्देवाने त्यांची नोंद घेतली नाही असं त्यांना वाटतं, त्यामुळे जिथे नोंद घेतली जाईल तिथे जाण्याची भूमिका त्यांची असू शकते असं शरद पवारांनी सांगितल्यामुळे खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले होते.

ऑडिओ क्लीप व्हायरल

एकनाथ खडसेंना भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले होते. त्यापैकीच, एका समर्थकाने थेट खडसेंना फोन करुन राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात विचारणा केली. त्यावर, अगोदर तिकडून प्रस्ताव तर येऊ द्या, ते आपल्याला मानाचं स्थान देणार का, याची खात्री करुनच आपण प्रवेश करूया, असे खडसेंनी म्हटले होते. खडसे आणि कार्यकर्त्याची ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा