शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिग्विजय सिंह यांच्या रॅलीत 'भगवे' पोलीस; राजकीय वातावरण तापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 15:23 IST

साध्या वेशातल्या पोलिसांची उपस्थिती वादात

भोपाळ: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोपाळमध्ये वातावरण तापलं आहे. भोपाळ मतदारसंघात काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यात चुरशीची लढत आहे. भाजपानं हिंदू दहशतवादावरुन दिग्विजय सिंह यांना सतत लक्ष्य केलं आहे. यानंतर आता सिंह यांच्या रॅलीत पोलीस कर्मचारी चक्क भगवं उपरणं घातलेले दिसून आले. 

आम्हाला साध्या वेशात आणि भगवं उपरणं घालून येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, अशी माहिती यावेळी उपस्थित असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं दिली. यानंतर मध्य प्रदेशातलं राजकीय वातावरण तापलं. मात्र भोपाळच्या पोलीस उपमहासंचालकांनी याचा इन्कार केला. रोड शोला सुरक्षा पुरवण्यासाठी पोलीस साध्या वेशात उपस्थित होते. मात्र त्यांनी भगवं उपकरण घातलं नव्हतं, असं उपमहासंचालकांनी सांगितलं. मध्य प्रदेशात आज काँग्रेस सोबतच भाजपाचाही रोड शो आहे. यात साध्वी प्रज्ञासिंह यांच्या प्रचारासाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा सहभागी होणार आहेत. दिग्विजय सिंह यांच्या रोड शोला पोलीस साध्या वेशात आल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. याबद्दल विचारलं असता, आम्हाला वरुन तशा सूचना देण्यात आल्याचं एका महिला पोलिसानं सांगितलं. दिग्विजय सिंह यांच्या रॅलीमध्ये कॉम्प्युटर बाबांसह अनेक साधू-संत सहभागी होणार आहेत. भोपाळमध्ये 12 मे रोजी मतदान होणार आहे. दिग्विजय सिंह यांना हिंदू दहशतवादावरुन सतत लक्ष्य करणाऱ्या भाजपाला प्रत्युत्तर देण्यासाठी काल (मंगळवारी) सिंह यांनी हवन केलं. यानंतर आज त्यांनी पत्नीसह मंदिरात पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत कॉम्प्युटर बाबादेखील उपस्थित होते. देशातले 7 हजार साधू तीन दिवस भोपाळमध्ये मुक्काम करणार असल्याची माहिती कालच कॉम्प्युटर बाबांनी दिली. या काळात सर्व साधू हठ योग आणि रोड शो करतील, असंदेखील ते म्हणाले होते. हे साधू 13 आखाड्याशी संबंधित असल्याचा दावादेखील त्यांनी केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019bhopal-pcभोपाळSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाDigvijaya Singhदिग्विजय सिंहBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliceपोलिस