मोदींनी मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्याने भाजपा नेता भावूक, फेसबुक पोस्टमधून दिली भावनांना मोकळी वाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 17:09 IST2021-07-07T17:03:37+5:302021-07-07T17:09:14+5:30
PM Modi Cabinet Expansion: भाजपाचे पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातील आमदार बाबूल सुप्रियो (Babul Supriyo) यांचाही राजीनामा घेण्यात आला असून, मंत्रिपद सोडावे लागल्यानंतर भावूक झालेल्या बाबूल सुप्रियो यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.

मोदींनी मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्याने भाजपा नेता भावूक, फेसबुक पोस्टमधून दिली भावनांना मोकळी वाट
नवी दिल्ली - पुढच्या काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारामध्ये काही मंत्र्यांचा खांदेपालट होणार आहे. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अनेक मंत्र्यांचा राजीनामाही घेण्यात आला आहे. त्यामुळे काही नेत्यांना धक्का बसला आहे. भाजपाचे पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातील आमदार बाबूल सुप्रियो (Babul Supriyo) यांचाही राजीनामा घेण्यात आला असून, मंत्रिपद सोडावे लागल्यानंतर भावूक झालेल्या बाबूल सुप्रियो यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत मंत्रिपदावर संधी दिल्याबद्दल त्यांनी मोदींचे आभारही मानले आहेत. (Babul Supriyo expresses grief over resignation of minister)
मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा आज संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. यामध्ये एकूण ४३ मंत्री शपथ घेणार आहेत. दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर आपल्या फेसबुक पोस्टममध्ये बाबूल सुप्रियो म्हणाले की, हो, मला मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. मी राजीनामा दिला आहे. मला मंत्रिमंडळात सहभागी करून देशसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो.