शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांना शह देण्यासाठी शिवसेनेची रणनीती; 'दादां'च्या विरोधकामागे उभी केली शक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 09:58 IST

आगामी महापालिका निवडणूक : राजकीय पक्षाकडून स्थानिक नेत्यांना रसद

ठळक मुद्देराहुल कलाटे यांच्याकडून चाचपणीराष्ट्रवादीचे सारथ्य पार्थ पवार करणार असल्याने त्यांच्या विरोधात शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे

हणमंत पाटीलपिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीत लोकशाही आघाडीचे घटक पक्ष एकत्र लढतील की नाही, हे अनिश्चित आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षाच्या वरिष्ठांनी स्थानिक नेत्यांना ताकत देण्यास सुरवात केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे सारथ्य लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार करणार असल्याने त्यांच्या विरोधात  शिवसेनेने खासदार श्रीरंग बारणे यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे.पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक अवघ्या १० महिन्यावर आली आहे. त्यादृष्टीने महापालिकेतील सत्ताधारी भाजप व विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वरिष्ठांनी नेत्यांनी पदाधिकारी व नगरसेवकांच्या बैठका सुरू केल्या. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवकांना पुण्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीत खडे बोल सुनावले, तसेच निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितले.दुसऱ्या बाजुला राज्यातील सत्ताधारी शिवसेनेनेही महापालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरवात केल्याचे दिसते. निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांशी सलगी असलेले शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांचा राजीनामा घेतला. त्यानंतर शहराची संपूर्ण सूत्रे अजित पवार यांचे कट्टर विरोधक असलेले खासदार बारणे यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यानंतर बारणे यांचे समर्थक असलेले नगरसेवक सचिन भोसले यांनी शिवसेना शहरप्रमुख व गजानन चिंचवडे यांची जिल्हा प्रमुखपदी फेरनिवड करण्यात आली. लवकरच शिवसेना महापालिका गटनेतेपदी बारणे समर्थक अश्विनी चिंचवडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.एका बाजुला पार्थ पवार राष्ट्रवादीचे महापालिका निवडणुकीत सारथ्य करणार असल्याची चाहूल लागल्याने शिवसेनेनेही बारणे यांच्या हाती शहराची संपूर्ण सूत्रे दिली आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम होण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.राहुल कलाटे यांच्याकडून चाचपणीस्थायी समिती सदस्य निवडीत शिवसेना पक्षाचे आदेश न पाळल्याचे निमित्त करीत राहुल कलाटे यांचा गटनेतेपदाचा राजीनामा घेण्यात आला. त्यामुळे खासदार बारणे यांच्यासाठी महापालिका कारभारातील अडथळा आपोआप बाजूला गेला. राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांत राहुल कलाटे यांनी विकास कामाच्या निमित्ताने भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेतली. त्यामुळे राजकीय भवितव्यासाठी राहुल कलाटे चाचपणी करीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाpimpri-acपिंपरीNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीparth pawarपार्थ पवारElectionनिवडणूकAjit Pawarअजित पवार