शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शहाणे व्हा! जनतेने नाही दिली तरीही खुर्ची मिळालीय, नीट काम करा; अमृता फडणवीसांचा टोला

By हेमंत बावकर | Updated: November 9, 2020 18:08 IST

Amruta Fadnavis news: विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपाची युती तुटली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या काही शिवसेनेवर आसूड ओढायच्या थांबत नाहीएत.

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपाची युती तुटली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या काही शिवसेनेवर आसूड ओढायच्या थांबत नाहीएत. आज त्यांनी जनतेने त्यांना निवडून दिलेलं नाही, पण तरीही आता खुर्ची मिळाली आहे तर नीट काम करावं, असा टोला हाणला आहे. 

'लोकमत'चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या 'माझी भिंत' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला अमृता फडणवीस उपस्थित होत्या. राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झाले. या कार्यक्रमात अमृता यांनी लोकमतशी बोलताना राज्य सरकारवर ही टिप्पणी केली.

राज्य सरकारने शहाणे व्हावे, जनतेने त्यांना निवडून दिलेलं नाही, पण तरीही आता खुर्ची मिळाली आहे तर नीट काम करावे. कुणी काही बोलतेय त्यावर रिएक्ट करून त्रास देणे बंद करावे, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच जलयुक्त शिवारसारख्या योजनेतही देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मोठा माणूस मोठाच राहतो, असेही त्यांनी सुनावले आहे. 

दरम्यान, पुस्तक प्रकाशन सोहळ्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब थोरातांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र मैदानात उतरणार, असल्याचे म्हटले. तर जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत उमेदवार निश्चित केले जातील, असे सांगितले. 

'माझी भिंत' मध्ये अनेक गुजगोष्टी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द आणि सामाजिक जीवन लाभलेल्या राजेंद्र दर्डा यांनी आपल्या समृद्ध अनुभवविश्वाची दारं या पुस्तकाच्या निमित्ताने उघडली आहेत. वर्तमान कितीही गुंतागंतीचं आणि जिकिरीचं असलं, तरी येणारा दिवस आपलाच आहे, असा दिलासा देणाऱ्या अनेक गुजगोष्टी 'माझी भिंत' या पुस्तकात सामावलेल्या आहेत. वेगाने विषारी होत चाललेल्या समाजमाध्यमांचा कट्टा शुभंकर विचारांच्या प्रसारासाठी किती सकारात्मकतेने वापरता येतो, याची प्रचिती या अनोख्या पुस्तकात मिळते. फेसबुकच्या भिंतीवर केवळ द्वेष आणि भांडणं नव्हे तर प्रेम आणि स्नेहही फुलवता येतो, याचा अनुभव देणारं हे संकलन; हा मराठीतल्या या स्वरुपाचा पहिलाच प्रयोग आहे. राजेंद्र दर्डा यांनी त्यांच्या अनुभवातून एक वेगळे विश्व यानिमित्ताने पुस्तकरुपाने समोर आणले आहे.

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेRajendra Dardaराजेंद्र दर्डाBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातJayant Patilजयंत पाटील