शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

वाचून दाखविलेल्या तीन मिनिटांच्या भाषणात पार्थ गडबडले; पण..लगेच म्हणाले.. '' सॉरी ''

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 3:21 PM

कागदावर लिहून आणलेले भाषण त्यांनी वाचून दाखविले खरे, पण..

ठळक मुद्देमावळ लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचा चिंचवड येथे कार्यकर्ता मेळावा

पिंपरी : मावळ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा.. सुरुवातीला झालेली जोरदार घोषणाबाजी.. आणि त्यामुळे नवख्या उमेदवाराचा काही काळ उडालेला गोंधळ..मावळ लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या माघारीनंतर ज्यांचे राजकारणात आगमन झाले ते पार्थ पवार भाषणासाठी उभे राहिले.. कागदावर लिहून आणलेले भाषण त्यांनी वाचून दाखविले खरे, पण.. अवघ्या तीन मिनिटांच्या भाषणात पार्थ अनेकदा गडबडले. परंतु, त्यांनी आज आपले पहिलेच भाषण आहे, त्यामुळे चूकभूल झाली तर माफ करा, अशी आर्जवही केली. मावळ लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा चिंचवड येथे रविवारी सायंकाळी झाला. या मेळाव्यात पहिल्यांदाच पार्थ पवार भाषणास उभे राहिले आणि कागदावर लिहून आणलेले भाषण अडखळत वाचून दाखविले. चिंचवड येथील मेळाव्यास माजी केंद्रीय मंत्री व  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री मदन बाफना, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, राष्टÑवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे उपस्थित होते. या मेळाव्यातील अडखळ्लेल्या भाषणात पार्थ म्हणाले, राजकारणात जरी नवीन असलो तरी तुम्ही विश्वास दाखवा तो मी सार्थ करुन दाखवेन..तसेच या मतदार संघाला बारामती व पिपंरी चिंचवडसारखे विकसित करेन.पार्थ पवार यांच्या भाषणाच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे काही काळ त्यांचा  गोंधळ उडाला.त्यानंतर कागदावर लिहून आणलेले भाषण वाचून दाखविले.या तीन मिनिटांच्या भाषणात त्यांनी सत्ताधारी भाजपा सरकारवर बेरोजगारी , भ्रष्टाचार, यांसारख्या मुद्द्यांवरून टीका केली. पण मावळ लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर यांनी भर दिला नसल्याचे दिसून आले. तरीही उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या. .........................तेव्हा कुठे गेली ५६ इंचाची छाती : शरद पवार जवानांची हत्या झाल्यानंतर जवानांच्या कुटुंबांचे सांत्वन करण्यापेक्षा पंतप्रधान धुळ्याचे दौरे करत होते. फिरत होते. तेव्हा छप्पन इंचाची छाती? असे उर बडवून घेण्यातच पंतप्रधानांनी धन्यता मानली. राफेलची फाईल संरक्षण खात्यातून चोरीला गेली. संरक्षण विषयक कागदपत्रे सांभाळता येत नाहीत, आणि कुठे घेऊन बसलात छप्पन इंचाची छाती. ना खाऊंगा ना खाने दुँगा असे पंतप्रधान म्हणतात. साडेतीनशे कोटींचे राफेल सोळाशे कोटींवर पोहोचले कसे? ज्या कंपनीने कधी कागदातील विमान बनविली नाही. त्यांना राफेल विमान बनविण्याचे काम दिले. यावरून दाल मे कुछ काला है, हे दिसून येते. अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारवर टीका केली. ...................जयंत पाटील म्हणाले, देशाचे कर्ज ५१ लाख कोटींवरून ८० लाख कोटींवर गेले. ३१ लाख कोटींचे कर्ज वाढविले गेले, कशासाठी? एक लाख कोटी रुपयांचा केलेल्या खर्चाचा हिशेब संसदेत दिला नाही. यावरून मोदी सरकारचा पारदर्शक कारभार लक्षात येईल...............दिवसा इकडे आणि रात्री तिकडे हे खपवून घेतले जाणार नाही. मॅचफिक्सिंग तर कदापि सहन केली जाणार नाही. असा सज्जड दम अजित पवार यांनी भरला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकmavalमावळSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार