शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

Pankaja munde: जेव्हा मला वाटेल, आता राम उरला नाही, तेव्हा...; पंकजा मुंडेंचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 14:12 IST

Pankaja Munde's Big Announcement: दिल्लीतील भेटीत पक्ष संघटनेवर चर्चा झाल्याचे पंकजा यांनी सांगितले. आपण बांधलेले घर का सोडायचे, असा सवाल पंकजा यांनी केला.

Pankaja Munde News: माझ्या डोळ्यात पाणी पाहून तुम्ही असे वागलात, तर तुमच्या डोळ्यातील पाणी पाहून मी कशी वागू, सांगा असा सवाल पंकजा यांनी कार्यकर्त्यांना केला. दबावंत्रासाठी मला ही जागा पुरणार नाही. मला त्यासाठी मोठी सभा घ्यावी लागेल. पंकजा दिल्लीला गेली, काहींनी बातमी केली की मोदींनी मला झापले वगैरे. माझ्या चेहऱ्यावरून असे वाटतेय का? असा सवाल पंकजा यांनी केला. मोदी, नड्डा यांच्यासोबत मी चर्चा केली. त्यांना राजीनामे जे दिले ते नाराजीतून दिलेत. मी पत्रकार परिषद घेऊनही राजीनामे दिलेत. यावर नड्डा यांनी तुम्ही त्यांना समजावण्यात यशस्वी व्हाल, एवढीच चर्चा झाल्याचा खुलासा पंकजा यांनी केला. (Pankaja munde announce her stand on Cabinet Exasion, PM Modi meet in front of Party workers of beed.)

Pankaja munde: ...म्हणून मी तुमचे राजीनामे नामंजूर करते; पंकजा मुंडेंची 'नाराज' मेळाव्यात घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी नुकत्याच केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रितम मुंडे (Pritam munde) यांना स्थान न दिल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरात ७० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यानंतर आज हे समर्थक पंकजा मुंडे (Pankaja munde) आणि प्रीतम मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले आहेत. या कार्यकर्त्यांना पंकजा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कोरोनाच्या नियमांना हरताळ फासण्यात आला. यावेळी पंकजा यांना बोलताना माईकच्या तांत्रिक बिघाडाला बराचवेळ सामोरे जावे लागले.

दिल्लीतील भेटीत पक्ष संघटनेवर चर्चा झाल्याचे पंकजा यांनी सांगितले. आपण बांधलेले घर का सोडायचे, असा सवाल पंकजा यांनी केला. मला जेव्हा वाटेल की आता यात राम नाही तेव्हा बघू, माझे नेते मोदी, शहा, नड्डा आहेत. केंद्रीय, राज्यात मंत्री नसले म्हणून काय झाले, मी राष्ट्रीय मंत्री आहे, अशा शब्दांत पंकजा यांनी नाराज कार्यकर्त्यांची समजूत घातली. 

मी निवडणूक हरले असले तरी संपले नाही...

डोळे चोळून पाहू, असे म्हटल्यावर कार्यकर्त्यांनी दोनतीनदा डोळे चोळले असे काही कार्यकर्त्यांनी सांगितले. यावर तुम्हाला राजीनामे द्यायला लावून मी मंत्रिपद मिळवले तर मी लहान नेता होईन, मोठा होणार नाही. पक्षाने संघर्ष यात्रा काढल्यानंतर सत्ता आल्यावर मंत्री केले. तेव्हादेखील तुम्ही नाराज झाला होता. मी नाव केले की नाही. हीच आपली शक्ती आहे, असे पंकजा यांनी सांगितले. मी निवडणूक हरले असले तरी संपले नाही. संपले असते तर मला संपविण्याचे प्रयत्नदेखील त्यांचे संपले असते. मी आहे. अविचाराने कोणताही निर्णय का घ्यायचा का, असा सवाल केला.

 प्रीतम मुंडेंची मंत्रीपदाची कुवत असताना त्यांना मिळाले नाही. आज भागवत कराड यांचे वय ६५, माझे ४२. मग माझ्या समाजाचा अपमान मी कसा करू, असे देखील त्या म्हणाल्या. मला पंतप्रधान व्हायचे असे काही नेते म्हणतात, मग काय करायचे? असा सवालही पंकजा यांनी केला. माझ्या चेहऱ्यावरील आनंद तुम्ही घेवून जा, तुमचे दु:ख माझ्या पदरात टाका, आणि हसऱ्या चेहऱ्याने परत जिल्ह्यात जा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीj. p. naddaजे. पी. नड्डाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारPritam Mundeप्रीतम मुंडे