शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Pandharpur Assembly By Election: राष्ट्रवादीनं शब्द पाळला, भाजपनं 'अभ्यास' केला; पंढरपुरात कोणाची सरशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 17:00 IST

Pandharpur Assembly By Election ncp declares Bhagirath Bhalke as its candidate: उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस; दिग्गज नेते पंढरपुरात येणार

पंढरपूर: राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादीनं भारत भालके यांचे चिरंजीव भगिरथ भालकेंना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. त्यामुळे पंढरपुरात उद्यापासून राजकीय वातावरण तापणार आहे. (Pandharpur Assembly By Election ncp declares Bhagirath Bhalke as its candidate) पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. तर भालके यांचा अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्ता भरणे यांच्यासह शिवसेना, काँग्रेसचे जिल्ह्यातील बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार हे निश्चित असल्यानं पंढरपुरात उद्या राजकीय धुळवड पहायला मिळणार आहे.राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा पदाधिकाऱ्याचा बंडाचा झेंडा; महाविकास आघाडीत ठिणगी?राष्ट्रवादीचे दिवंगत आ. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून कै. भारत भालके यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी निश्चित होती. भगीरथ भालके किंवा त्यांच्या मातोश्री जयश्री भालके यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार हे निश्चित होतं. प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपने मागील तिन्ही निवडणुकीत झालेली मतविभागणी त्यामुळे कै. आ. भारत भालके यांचा झालेला विजय याचा अभ्यास करत मतविभागणी टाळण्यासाठी भाजपकडून इच्छुक असलेले आ. प्रशांत परिचारक यांची समजूत काढत एकास-एक उमेदवार देण्यात यश मिळवलं आहे. समाधान आवताडे यांना उमेदवारी देऊन आघाडीसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे.

टॅग्स :Bharat Bhalkeभारत भालकेNCPराष्ट्रवादी काँग्रेसpandharpur-acपंढरपूरBJPभाजपाAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस