Pandharpur Assembly By Election: राष्ट्रवादीनं शब्द पाळला, भाजपनं 'अभ्यास' केला; पंढरपुरात कोणाची सरशी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 04:53 PM2021-03-29T16:53:30+5:302021-03-29T17:00:44+5:30

Pandharpur Assembly By Election ncp declares Bhagirath Bhalke as its candidate: उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस; दिग्गज नेते पंढरपुरात येणार

Pandharpur Assembly By Election ncp declares Bhagirath Bhalke as its candidate | Pandharpur Assembly By Election: राष्ट्रवादीनं शब्द पाळला, भाजपनं 'अभ्यास' केला; पंढरपुरात कोणाची सरशी?

Pandharpur Assembly By Election: राष्ट्रवादीनं शब्द पाळला, भाजपनं 'अभ्यास' केला; पंढरपुरात कोणाची सरशी?

Next

पंढरपूर: राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादीनं भारत भालके यांचे चिरंजीव भगिरथ भालकेंना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. त्यामुळे पंढरपुरात उद्यापासून राजकीय वातावरण तापणार आहे. (Pandharpur Assembly By Election ncp declares Bhagirath Bhalke as its candidate)



पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. तर भालके यांचा अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्ता भरणे यांच्यासह शिवसेना, काँग्रेसचे जिल्ह्यातील बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार हे निश्चित असल्यानं पंढरपुरात उद्या राजकीय धुळवड पहायला मिळणार आहे.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा पदाधिकाऱ्याचा बंडाचा झेंडा; महाविकास आघाडीत ठिणगी?

राष्ट्रवादीचे दिवंगत आ. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून कै. भारत भालके यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी निश्चित होती. भगीरथ भालके किंवा त्यांच्या मातोश्री जयश्री भालके यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार हे निश्चित होतं. प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपने मागील तिन्ही निवडणुकीत झालेली मतविभागणी त्यामुळे कै. आ. भारत भालके यांचा झालेला विजय याचा अभ्यास करत मतविभागणी टाळण्यासाठी भाजपकडून इच्छुक असलेले आ. प्रशांत परिचारक यांची समजूत काढत एकास-एक उमेदवार देण्यात यश मिळवलं आहे. समाधान आवताडे यांना उमेदवारी देऊन आघाडीसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे.

Web Title: Pandharpur Assembly By Election ncp declares Bhagirath Bhalke as its candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.