शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

Opinion Poll : दिल्लीनंतर आता या राज्यातही आप मुसंडी मारणार, सर्वात मोठा पक्ष ठरणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 8:18 PM

Opinion Poll: दिल्लीच्या सत्तेत पाय घट्ट रोवल्यानंतर आता आम आदमी पक्ष अजून एका राज्यात मोठं यश मिळवण्याच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहे.

ठळक मुद्देएबीपी न्यूज आणि सी वोटरने पंजाबमधील जनतेचा कल जाणून घेण्यासाठी हा सर्व्हे केला होताया सर्व्हेनुसार पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. तर आघाडी मोडल्यानंतर स्वतंत्र झालेल्या अकाली दल आणि भाजपाचीही निराशा होणारआप सर्व बड्या पक्षांना मागे टाकत पंजाबमधील सर्वात मोठा पक्ष ठरणार

नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृ्त्वाखाली दिल्लीच्या सत्तेत पाय घट्ट रोवल्यानंतर आता आम आदमी पक्ष (AAP)अजून एका राज्यात मोठं यश मिळवण्याच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहे. एबीपी न्यूज आणि सी वोटरने (ABP News-C Voter) केलेल्या सर्व्हेमध्ये आम आदमी पक्ष पंजाबमध्ये मोठी मुसंडी मारणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, आज निवडणुका झाल्यास आम आदमी पक्ष काँग्रेसला (Congres) मात देत पंजाबमधील सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. (Opinion Poll: After Delhi, AAP will now be the biggest party in Punjab too, if elections are held today) 

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने स्थापन केलेल्या सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज आणि सी वोटरने पंजाबमधील जनतेचा कल जाणून घेण्यासाठी हा सर्व्हे केला होता. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे.  या सर्व्हेनुसार पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. तर आघाडी मोडल्यानंतर स्वतंत्र झालेल्या अकाली दल आणि भाजपाचीही निराशा होणार आहे. अकाली दल तिसऱ्या तर भाजपा चौथ्या स्थानी राहण्याची शक्यता आहे. तर आप सर्व बड्या पक्षांना मागे टाकत पंजाबमधील सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे.  सर्व्हेमधील आकडेवारीनुसार राज्यातील एकूण ११७ जागांपैकी ४३ ते ४९ जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. तर आपला ५१ ते ५७ जागा मिळू शकतात. अकाली दलाला १२ ते १८ जागा मिळू शकतात. तर भाजपाला ० ते ५ जागा मिळतील. इतर पक्षांच्या खात्यात ० ते ३ जागा जाण्याची शक्यता आहे.   ओपिनियन पोलनुसार असं असेल पक्षीय बलाबल एकूण जागा ११७ काँग्रेस - ४३ ते ४९ आप - ५१ ते ५७ अकाली दल - १२ ते १८ भाजपा - ० ते ५ इतर - ० ते ३ 

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालPunjabपंजाबcongressकाँग्रेस