शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
4
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
5
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
6
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
7
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
8
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
9
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
10
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
11
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
12
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
13
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
14
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
15
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
16
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
17
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
18
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
19
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
20
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल

SurJyotsna Awards 2021:'लिहून घ्या! केंद्र सरकार फ्री झालं की महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस'; भाजपा नेत्याने सांगितली वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 8:52 PM

Operation lotus in Maharashtra soon: राज्य सरकारची कामगिरी समाधान कारक नाही हे सगळ्यांच दिसतंय. लोकांनाही भाजपचंच सरकार हवंय. मुंबई महापालिकेत भाजप १२१ जागा जिंकणार, असे आमदार राज पुरोहित यांनी दावा केला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले तेव्हापासून भाजपाचे नेते काही दिवसांतच, लवकरच सरकार कोसळणार असल्याचे सांगत आले आहेत. तर आघाडीचे नेते पुढची 25 वर्षे भाजपाचे सरकार येत नाही असे टोले हाणत आले आहेत. नुकतीच राज्यातील सरकार कोसळणार अशी चर्चा सुरु झाली होती. त्यावर भाजपाच्या आमदाराने लेखी लिहून देतो, असे जाहीर आव्हान दिले आहे. (Raj purohit talk on Operation lotus in Maharashtra)

भाजपाचे आमदार राज पुरोहित यानी हे वक्तव्य केले आहे. लोकमतच्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. केंद्र सरकार फ्री झालं की महाराष्ट्रातील सरकार जाणार हे लिहून घ्या, असे सांगतानाच केंद्र सरकार फ्री झाले की काय याचा अर्थही त्यांनी सांगितला. केंद्र सरकार फ्री झालं म्हणजे नेमकं काय? असं विचारलं असता शेतकरी आंदोलन, बंगाल निवडणूक यातून फ्री झालं की राज्यात ऑपरेशन लोटस सुरु होणार असल्याचे ते म्हणाले. 

SurJyotsna Awards 2021: राज्यात काँग्रेसचा उपमुख्यमंत्री होणार का?; अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं...

राज्य सरकारची कामगिरी समाधान कारक नाही हे सगळ्यांच दिसतंय. लोकांनाही भाजपचंच सरकार हवंय. मुंबई महापालिकेत भाजप १२१ जागा जिंकणार आणि भाजपचा झेंडा फडकणार आहे. शिवसेना फक्त सांगते. पण त्यांच्यात हिंदुत्व वगैरे काही उरलेलं नाही. आता फक्त कमळ कमळ आणि फक्त कमळ, असे ते म्हणाले. 

संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा आज सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रंगतोय. या सोहळ्यात ख्यातनाम गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे; तसेच उदयोन्मुख गायक-गायिका प्रथमेश लघाटे आणि हरगून कौर यांचा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिले जातात.

आशिष शेलार काय म्हणाले?आघाडीचं स्टेअरिंग उद्धव ठाकरेंच्या हातात आहे पण त्यांचे मंत्री अडथळे आणतायत का? असं विचारलं असता शेलार यांनी यामुळे सरकारची दिशा चुकतेय असे म्हटले. त्यानंतर जाता जाता दिशा या शब्दाचा अर्थ तुम्ही तुमच्या पद्धतीनं घ्या, असं मिश्किलपणे म्हणाले. दिशा सालियान आत्महत्येवरून शेलारांनी उद्धव ठाकरे यांचे पूत्र आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर बाण सोडला आहे.  

टॅग्स :sur Jyotsna awardसूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRaj Purohitराज पुरोहित