शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"प्रत्येकाला राज ठाकरे होता येत नाही", पक्षाच्या गळतीवर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 14:40 IST

पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कल्याण-डोंबिवलीत खिंडार पडलं आहे. मनसेच्या राजेश कदम यांनी सोमवारी शिवसेनेत तर आज मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला सावरण्याचं आव्हान आता मनसेच्या नेत्यांसमोर आहे. पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

"निवडणुकीच्या काळात पक्षांतराच्या घटना होतच असतात. यात नवीन काहीच नाही. काही जणांनी पक्ष सोडला म्हणून पक्षाला फरक पडत नाही. जुने गेले तर नवे कार्यकर्ते अशा ठिकाणी उभारी घेत असतात. सगळ्यांना राज ठाकरे होता येत नाही", असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. 

'...म्हणून मी भाजपात प्रवेश केला'; मनसेच्या नगरसेवकाने सांगितली अखेर मन की बात

मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी 'कृष्णकुंज'वर आज मनसेच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला बाळा नांदगावकर यांच्यासोबच कल्याण-डोंबिवलीचे आमदार राजू पाटील उपस्थित होते. बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.   

डोंबिवलीत शिवसेनेने पाडले मनसेला खिंडार, पालकमंत्री, खासदारांची राजकीय खेळी

"राजकारणात पक्षांतराच्या गोष्टी घडतच असतात. प्रत्येक निवडणुकीवेळी प्रत्येक पक्षात असं होत असतं. यात नवीन काहीच नाही. मध्यंतरी मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कितीतरी लोक सोडून दुसऱ्या पक्षात गेले, काँग्रेसचे लोकही सोडून गेले. पुढे जे काही होईल ते बघा, त्यावर मी आताच भाष्य करण्यात पॉइंट नाही", असं बाळा नांदगावकर म्हणाले. 

आमीष दाखवल्यानं हळबेंनी पक्ष सोडला- राजू पाटीलमनसेचे कल्याण-डोंबिवलीचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मंदार हळबे यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. हळबे यांच्या पक्षांतराबाबत बोलताना कल्याण-डोंबिवलीचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी हळबे यांच्यावर आरोप केला. "पक्ष सोडणाऱ्यांची पक्षावर नाराजी नव्हती असं ते म्हणतं आहेत. तरीही ते दुसऱ्या पक्षात गेले. मग यामागे समोरच्या पक्षाकडून आमीष दिलं गेलं नाही, तर मग इतर दुसरं कारण काय असू शकतं?", असा सवाल राजू पाटील यांनी उपस्थित केला. 

स्वागतासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करु; अयोध्या दौऱ्याआधी विहिंपच्या नेत्यांचं राज ठाकरेंना आश्वासन

"एक-दोन कार्यकर्ते सोडून गेल्यानं पक्ष म्हणून काही फरक पडत नाही. निवडणूक आली की असे धक्के बसणारच. याला काही जास्त महत्व देण्याची गरज नाही. आम्ही निवडणुकीसाठी जोमाने तयारी करत आहोत. आमीष दाखवल्यानंच पक्षांतरं होतं आहेत", असंही ते पुढे म्हणाले. 

टॅग्स :Bala Nandgaonkarबाळा नांदगावकरRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेRaju Patilराजू पाटील