शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

...तर महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती; अमित शहा यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 06:57 IST

मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नव्हता; शहांनी स्पष्टच सांगितलं

- महेश सरनाईकसिंधुदुर्ग : मी बंद खोलीत राजकारण कधी करत नाही. जे करतो ते जाहीरपणे करतो. शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द मी दिला नव्हता, असे सांगतानाच आम्हीही तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर तुमचा पक्षही संपला असता, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथे शिवसेनेवर केली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे (ता. कुडाळ) येथील लाइफटाइम मेडिकल काॅलेजचे उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.शहा पुढे म्हणाले, राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला दिलेला जनादेश ठोकरून महाविकास आघाडीचे तीनचाकी सरकार बनले आहे. सत्तेच्या लालसेपोटी एकत्र आलेल्या तिघांच्या दिशा मात्र वेगवेगळ्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांंचे सिद्धांत शिवसेनेने सत्तेसाठी तापी नदीत विसर्जित केले आहेत. आम्ही वचनाला जागणारे आहोत. बिहारमध्ये नितीशकुमारांच्या जागा कमी निवडून आल्यानंतर देखील, आधी शब्द दिल्याप्रमाणे त्यांनाच मुख्यमंत्री केले, असेही शहा म्हणाले.निवडणुकीच्या काळात प्रत्येक सभेत शिवसेनेच्याही पोस्टरवर मोदींचा मोठा फोटो होता. तेव्हा आम्ही सगळे सांगत होतो, फडणवीस मुख्यमंत्री बनणार. तेव्हा का विरोध केला नाही, असा सवाल करून शहा म्हणाले, ३७० कलम मोदींनी हटवले, अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मंदिर बनवत आहोत. याचे स्वागत करतानाही शिवसेनेचे नेते दबकत होते.गरिबांना पाच लाखांपर्यंत उपचाराचा खर्च देणारआपण आरोग्य सेवेवर सर्वाधिक भर देत आहोत. ७० वर्षांत मेडिकल कॉलेज बांधले. त्याच्या ५० टक्के केवळ सहा वर्षांत बांधले. २ एम्स होते... आज २२ बांधतो आहोत. मेडिकलच्या जागाही वाढविल्या आहेत. आरोग्य क्षेत्राची तरतूद १३७ टक्के वाढवली आहे. पंतप्रधान जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजनेत सामान्यांना, गरिबांना पाच लाखांपर्यंत उपचार खर्च केंद्र देणार असल्याची घोषणाही अमित शहा यांनी केली.भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना त्रास महाराष्ट्रात इतके मोठे वादळ आले, तेव्हा मुख्यमंत्र्यांना कोणी पाहिले का इथे... ? देवेंद्रजी फिरत होते. हे सरकार भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना त्रास देत आहे; पण आमचे कार्यकर्ते घाबरणार नाहीत, असा टोलाही शहा यांनी लगावला. ‘भारतीय उपचार पद्धती जगाने स्वीकारली’अमित शहा म्हणाले, मोदींच्या नेतृत्वात भारताने कोरोनाशी केलेल्या लढाईचे सगळ्या जगभरात स्वागत होत आहे. याआधी आपल्याकडे व्हेंटिलेटर, मास्क, पीपीई कीट इथे बनत नव्हते. अवघ्या १० महिन्यांत आपण पहिल्या क्रमांकाचे निर्यातदार झालो आहोत. जगभरात कोरोना लस भारत पुरवत आहे. आपण तयार केलेल्या उपचार पद्धतीची दिशा आज जगात स्वीकारली गेली आहे, असेही शहा म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेRam Mandirराम मंदिर