भाजप-मनसे एकत्र येणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील एकाच वाक्यात स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 01:06 PM2021-08-06T13:06:54+5:302021-08-06T13:08:33+5:30

तसा कोणताच प्रस्ताव नाही, वेळ यावी लागते; राजभेटीनंतर चंद्रकांत पाटलांची सूचक विधानं

no discussion about alliance bjp leader chandrakant patil after meeting mns chief raj thackeray | भाजप-मनसे एकत्र येणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील एकाच वाक्यात स्पष्ट बोलले

भाजप-मनसे एकत्र येणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील एकाच वाक्यात स्पष्ट बोलले

Next

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज यांच्यासोबत राजकीय चर्चा झाली. पण युतीची चर्चा झाली नसल्याचं पाटील यांनी सांगितलं. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी आमची अचानक भेट झाली होती. त्यावेळीच मुंबईत भेटायचं ठरलं होतं, असं पाटील यांनी सांगितलं.

'राज यांच्या परप्रांतीयांबद्दलच्या भूमिकेबद्दल माझ्या मनात काही प्रश्न होते. ते मी नाशिकच्या भेटीत बोलून दाखवले. त्यानंतर राज यांच्या परप्रांतीयांबद्दलच्या भाषणाची एक क्लिप मी पाहिली. ती उत्तर प्रदेश, बिहारमध्ये व्हायरल झाली होती. त्यातून माझ्या काही शंका दूर झाल्या. तर इतर काही शंकांबद्दल आज आमची चर्चा झाली,' अशी माहिती पाटील यांनी दिली.

'राज यांच्यासोबत राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. राज्याचे नेते म्हणून तुम्ही मोठ्या भूमिकेत यायला हवं असं मी त्यांना सांगितलं. यावेळी युतीबद्दल चर्चा झाली नाही. तसा कोणताही प्रस्ताव नाही. राज यांच्या मनात परप्रांतियांच्या मनात कोणतीही कटुता नाही. त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न मी केला. एकत्र येण्याचा प्रस्ताव नाही. त्यासाठी वेळ यावी लागते,' असं सूचक विधान पाटील यांनी केलं.

Web Title: no discussion about alliance bjp leader chandrakant patil after meeting mns chief raj thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.