शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

फिरसे एक बार नितीश सरकार! सातव्यांदा हाती घेणार बिहारचा कारभार; उद्या शपथविधी

By कुणाल गवाणकर | Published: November 15, 2020 2:04 PM

नितीश कुमार सातव्यांदा घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

पाटणा: संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत. उद्या सकाळी कुमार यांचा शपथविधी सोहळा संपन्न होईल. नितीश कुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. भाजप नेते सुशील कुमार मोदी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मोदी याआधीच्या मंत्रिमंडळातही उपमुख्यमंत्री होते. आज पाटण्यात झालेल्या एनडीएच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला.सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं आज पाटण्यात एनडीएची महत्त्वाची बैठक झाली. तत्पूर्वी संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) बैठकीत नितीश कुमार यांची विधिमंडळ दलाच्या नेतेपदी निवड झाली. दुसऱ्या बाजूला भाजप नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर जेडीयू आणि भाजपच्या नेत्यांची संयुक्त बैठक झाली. त्यात नितीश कुमार हेच एनडीए सरकारचे मुख्यमंत्री असतील, यावर शिक्कामोर्तब झालं.भाजप नितीश कुमारांना 'धोबीपछाड' देणार?; 'त्या' बैठकीकडे सगळ्यांचं लक्षपाटण्यात झालेल्या एनडीएच्या बैठकीला एनडीएतील चारही पक्षांचे (जेडीयू, भाजप, हम, व्हीआयपी) महत्त्वाचे नेते उपस्थित होते. नितीश यांचा शपथविधी उद्या संपन्न होईल. नितीश यांच्या मंत्रिमंडळात याआधी काम केलेल्या अनेक मंत्र्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी साडे अकरा ते साडे तीनच्या दरम्यान शपथविधी सोहळा आयोजित करण्यात येईल.‘’भाजपा ईव्हीएमचा गैरवापर करतो, बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यास ‘औकात’ दिसेल’’भाजप एनडीएमधील सर्वात मोठा पक्षभाजपनं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७४ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजप एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनं पहिल्यांदाच जेडीयूपेक्षा जास्त जिंकल्या आहेत. त्यामुळे आता भाजप युतीमधील मोठा भाऊ ठरला आहे. जेडीयूला विधानसभा निवडणुकीत ४३ जागा मिळाल्या आहेत. मात्र तरीही सरकारचं नेतृत्त्व नितीश कुमारच करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेतृत्त्वानं स्पष्ट केलं आहे.कंदील, कमळ आणि बिहारचे महाराष्ट्र कनेक्शननितीश कुमार यांची कसोटी लागणारनितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपपेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपच्या आमदारांची संख्या वाढल्यानं नितीश कुमार यांच्याकडे सरकारचं नेतृत्त्व राहिलं, तरीही सरकारवर भाजपचं वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचं नेतृत्त्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपा