शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

भाजपनं (नंबर)गेम केल्यानं नितीश नाराज; आज शिवसेना स्टाईलनं उत्तर देणार?

By कुणाल गवाणकर | Published: December 27, 2020 10:18 AM

अरुणाचल प्रदेशात भाजपचा जेडीयूला धक्का; सातपैकी सहा आमदार फोडले

पटना: बिहारमध्ये संयुक्त जनता दलासोबत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानं अरुणाचल प्रदेशमध्ये संयुक्त जनता दलाला (जेडीयू) धक्का दिला. जेडीयूचे सातपैकी सहा आमदार भाजपनं फोडले. त्यामुळे जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अतिशय नाराज असल्याचं समजतं. या पार्श्वभूमीवर आज जेडीयूची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यामध्ये भाजपला धक्का देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नितीश कुमार भाजपला टक्कर देण्यासाठी त्यांचा जुनाच डाव नव्याने टाकू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपसोबत असताना शिवसेनेनं अनेक निर्णयांवरून मोदी सरकारवर तोफ डागली होती. नोटबंदीला सत्तेत राहूनही विरोध केला. पहिला आवाज आम्ही उठवला, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वारंवार म्हटलं आहे. याशिवाय काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीसोबत, बिहारमध्ये जेडीयूसोबत केलेल्या युतीवरूनही शिवसेनेनं भाजपला लक्ष्य केलं होतं. काश्मीर प्रश्न, गोमांस बंदीबद्दलची भाजपची भूमिका यासह अनेक विषयांवर शिवसेनेनं सामनामधून भाजपला लक्ष्य केलं होतं. आता तशीच रणनीती जेडीयूकडून वापरली जाऊ शकते.बिहारमध्ये एकत्र सत्तेत असताना अरुणाचल प्रदेशात भाजपनं जेडीयूला धक्का दिला. त्यामुळे आता जेडीयूकडूनही भाजपला त्यांच्याच पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं. भाजपप्रणित एनडीएमध्ये राहून भाजपला धक्के देण्याची जेडीयूची रणनीती असू शकते. आज जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होत आहे. यामध्ये काही राष्ट्रीय मुद्द्यांवर भाजपपेक्षा वेगळी भूमिका घेतली जाऊ शकते. केंद्रात, राज्यात सोबत राहून भाजपवर वेळोवेळी शरसंधान साधण्याची भूमिका नितीश घेऊ शकतात. २०१२ मध्ये एनडीएसोबत; पाठिंबा मात्र यूपीएच्या उमेदवाराला२०१२ मध्ये नितीश एनडीएमध्ये होते. त्यावेळी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत नितीश यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देत सगळ्यांनाच धक्का दिला. त्यावेळी एनडीएनं राष्ट्रपतीच्या निवडणुकीत पी. ए. संगमा यांना उमेदवारी दिली होती. मात्र जेडीयूनं त्यांच्या ऐवजी काँग्रेसच्या प्रणब मुखर्जींना पाठिंबा दिला आणि त्यांच्याच बाजूनं मतदान केलं. शिवसेनेनंदेखील अशाच प्रकारचं राजकारण केलं होतं.२०१५ मध्ये महागठबंधनसोबत; समर्थन मात्र मोदी सरकारच्या निर्णयांचं२०१५ मध्ये नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत महागठबंधन करत विधानसभा निवडणूक जिंकली. राष्ट्रीय जनता दलापेक्षा जेडीयूचे कमी आमदार असूनही ते मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनी अनेकदा केंद्र सरकारच्या निर्णयांचं समर्थन केलं. नोटबंदी, जीएसटी, बेनामी संपत्ती, सर्जिकल स्ट्राईकचं नितीश यांनी कौतुक केलं होतं.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे