शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आमच्याकडून 'ती' चूक झाली; विज बिलावरून अशोक चव्हाणांचा 'शॉकिंग' खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 20:55 IST

अशोक चव्हाणांच्या कबुलीमुळे भाजप, मनसेच्या हाती आयतं कोलीत

मुंबई: लॉकडाऊन काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलावरून भारतीय जनता पक्षासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. भाजप पाठोपाठ आज मनसेनं राज्यभर आंदोलनं केली. वाढीव विज बिलावरून ठाकरे सरकारबद्दल नाराजी असताना, विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असताना आता सामाजिक सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या एका धक्कादायक खुलाशामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळण्याची शक्यता आहे. ...म्हणून स्वतःची वीजबिले भरणाऱ्या भाजपा आमदारांचे आभार, ऊर्जामंत्र्यांनी लगावला सणसणीत टोलाउर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली. त्यांनी अशा प्रकारची पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी होती. प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होतं. पण तसं झालं नाही, ही आमच्याकडून चूक झाली, अशी कबुली मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. चव्हाण यांनी दिलेल्या घरच्या अहेरामुळे राज्य सरकारमध्ये समन्वय नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.कारभार हाकता येत नसेल तर ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा देऊन कारकुनी करावी : प्रवीण दरेकरकाय म्हणाले ऊर्जामंत्री नितीन राऊत?तिन्ही वीज कंपन्याही कुणाच्या तरी ग्राहक आहेत. कोरोनाच्या काळात आलेल्या तीन महिन्यांचं वीज देयके कुणाला जास्त आले असेल, तर तीन हफ्ते पाडून आणि कुणी एकत्र भरत असेल तर २ टक्के सवलत देऊ, अशा तरतुदी केल्या आहेत. याला पैसा लागतो, पैशाचं सोंग घेता येत नाही. माफीचा निर्णय राज्य सरकारचा आहे. कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानामुळे आम्हाला थोडं माघारी यावं लागलं, असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते....मग केंद्राकडून दिलासा का नाही?; राऊतांचा सवालराज्यात विरोधी पक्षात असलेल्या भाजपचं केंद्रात सरकार आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात घसरण होत असूनही मोदी सरकार त्याच दरानं म्हणजेच ८५ रुपयानं पेट्रोल विकत आहे. आमचे जीएसटीचे २८ हजार कोटी रुपये केंद्राकडे अडकले आहे. ते पैसे द्यायला सरकार तयार नाही. महापूर, अतिवृष्टीतही केंद्रानं मदत केलेली नाही. राज्यातील भाजप नेते कर्जमाफी देण्याची मागणी करतात. पण तुमच्या काळात राज्याची तिजोरी रिकामी झाली. भाजप सरकारनं राज्यावर ४ लाख कोटींचं कर्ज केलं. त्याचं काय?, असे सवाल राऊत यांनी विचारले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणNitin Rautनितीन राऊतBJPभाजपाcongressकाँग्रेसMNSमनसे