शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांच्या स्मारकाचं गोमुत्राने शुद्धिकरण करणाऱ्या शिवसेनेवर नितेश राणेंचा प्रहार; म्हणाले, पुढच्या वेळी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 08:45 IST

Nitesh Rane Criticize Shiv Sena : नारायण राणे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला भेट देऊन निघून गेल्यानंतर शिवसैनिकांनी गोमुत्र शिंपडून या ठिकाणाचं शुद्धिकरण केलं होतं. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे.

मुंबई - केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काल आपल्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात दादर येथील शिवाजी पार्कमधील शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून केली होती. (Nitesh Rane Criticize Shiv Sena)दरम्यान, नारायण राणे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला भेट देऊन निघून गेल्यानंतर शिवसैनिकांनी गोमुत्र शिंपडून या ठिकाणाचं शुद्धिकरण केलं होतं. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. शुद्धिकरण करायचंच असेल तर आता ते शिवसेनेचं करावं लागेल, अशी टीका या घटनेनंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली होती. तर आता बाळासाहेबांच्या स्मारकाचं शुद्धिकरण करणाऱ्या शिवसेनेला नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनीही शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. (Nitesh Rane Criticize Shiv Sena purifying Balasaheb's memorial with Gomutra )

शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या स्मारकाचं गोमुत्र शिंपडून शुद्धिकरण केल्यानंतर नितेश राणे यांनी एक ट्विट केले. त्यात ते म्हणाले की, ‘’अडवण्याची भाषा करणारे गोमुत्रावर आले आहेत. म्हणून पुढच्यावेळी चड्डीत राहायचं.’’ आता नितेश राणेंच्या या ट्विटला शिवसेना काय उत्तर देते हे पाहावे लागेल.

 दरम्यान, बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केल्यानंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. आशिष शेलार ट्विट करत म्हणाले की, अशुद्ध आणि शुद्ध असा भेदभाव करणारी मनस्थिती प्रबोधनकार ठाकरेंना मानणाऱ्या पक्षाची आहे. ही विदारक स्थिती आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीची झाली आहे. ती जागा काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नाही. ती मुंबई महानगरपालिकेची आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जागी कुणी जायचं. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शुद्धीकरण करायचं असेल तर शिवसेनेचं करावं लागेल, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

आशिष शेलार पुढे म्हणाले की, ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकलं. त्या छगन भुजबळांसोबत सत्ता स्थापनेसाठी बसायचं. स्वत:च्या वडिलांच्या विचारांना आणि प्रेरणेला बगल देऊन केलं आहे. या शिवसेनेचं शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे. शुद्धीकरणाच्या नावाने नौटंकी करू नये, असा घणाघात देखील आशिष शेलार यांनी केला आहे.

नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान,  दादर येथील शिवाजी पार्क मैदानात दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं. यानंतर राणेंनी माध्यमांशी संवाद साधला. "साहेब आज हवे होते. ते असते तर त्यांनी नक्कीच मला आशीर्वाद दिला असता आणि म्हणाले असते नारायण तू असाच पुढे जात राहा. साहेबांचा हात जरी आज माझ्या डोक्यावर नसला तरी त्यांचे आशीर्वाद नक्कीच माझ्यासोबत आहेत असं मी समजतो", असं नारायण राणे म्हणाले होते. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे