शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

“नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, मुंबई-पुणे हायवेची विक्री कोणी केली, याचा आधी जबाब द्या”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 23:30 IST

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर देत, तुम्हाला मुद्रीकरण म्हणजे का हे माहिती आहे का, असा खोचक सवाल केला.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रातील सरकारी संपत्ती खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाइन असे या उपक्रमाला नाव देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत रेल्वे, ऊर्जा ते रस्त्यापर्यंत अनेक मूलभूत सेवा-सुविधांच्या क्षेत्रातील सरकारी संपत्तीचे मॉनेटायझेशन केले जाणार आहे. यावरून काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर देत, तुम्हाला मुद्रीकरण म्हणजे का हे माहिती आहे का, असा खोचक सवाल केला. (nirmala sitaraman replied rahul gandhi over criticism on national monetization pipeline)

मोदी सरकारकडून आता कोकण रेल्वेचे खासगीकरण? ७२८१ कोटींचा निधी उभारणार

नॅशनल मोनेटाइजेशन पाईपलाईन उपक्रमावरुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 70 वर्षात जनतेच्या पैशाने बनवलेली देशाची संपत्ती त्यांच्या काही उद्योगपती मित्रांना विकत आहेत, असा आरोप केला होता. याला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर देत, त्यांना मोनेटायझेशन म्हणजे काय, याची माहिती आहे का, असा बोचरा सवाल केला आहे. सीतारमण यांनी सार्वजनिक बँकाच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

“ठाकरे सरकार कामच करत नसेल, तर मग आरत्या ओवाळायच्या का”; भाजपची टीका

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनची विक्री कोणी केली

मुंबई-पुणे महामार्ग कोणी विकला, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनची विक्री कोणी केली याचे आधी उत्तर द्या, असे सांगत मुंबई-पुणे हायवेची खासगी क्षेत्राला जवळपास ८००० कोटींना विक्री कोणत्या सरकारने केली. २००८ मध्ये नवी दिल्ली रेल्वे स्टेशनचे खासगीकरण झाले. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या विक्रीचा प्रस्ताव कोणत्या सरकारने मागवले होते. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर आता भावोजीची मालकी आहे ना, असा थेट प्रश्न करत सीतारमण यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! रोजगाराला चालना मिळणार; १५ हजार कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी

सामन्यांची दिशाभूल करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

मागील ७० वर्षात देशात जे उभे राहिले, त्याचे कॉमनवेल्थ खेळांच्या वेळी काय झाले. संपत्ती निर्माण करताना तयार झालेली मलाई कोणी खाल्ली. कॉंग्रेसने सत्तेच्या काळात रस्ते, रेल्वे, बंदरे, खाणी यांची विक्री केली आणि पैसा बनवला. याचा आधी त्यांनी जबाब द्यावा आणि मग मोदी सरकारवर टीका करावी, असा घणाघात सीतारामन यांनी केला. सामन्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. त्याला जनता भुलणार नाही. केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करण्यापूर्वी विरोधकांनी अभ्यास करावा, असा सल्लाही सीतारामन यांनी यावेळी बोलताना दिला. 

टॅग्स :Politicsराजकारणnirmala sitharamanनिर्मला सीतारामनRahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेसBJPभाजपा